कुशल पंजाबीच्या निधनानंतर दुःखी आहे मित्राची पत्नी, लिहिली भावुक पोस्ट

कुशल पंजाबीच्या निधनानंतर दुःखी आहे मित्राची पत्नी, लिहिली भावुक पोस्ट

कुशलचा जवळच्या मित्राच्या पत्नीनं कुशलच्या निधनानंतर इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला. 37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं आहे. एकीकडे कुशलचे नातेवाईक मात्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. तर दुसरीकडे कुशलचा जवळचा मित्र करणवीर बोहराची पत्नी तीजे सिद्धू हिनंही कुशलच्या निधनानंतर इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. करणवीर प्रमाणेच तीजे आणि कुशल सुद्धा एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.

कुशलचा त्याच्या मुलासोबचा फोटो शेअर करत तीजेनं लिहिलं, हे सर्व एका सायकल प्रमाणं आहे. काही आत्म्यांना पृथ्वी सोडावी लागते कारण त्यांच्या जागी नव्या आत्म्यांना या ठिकाणी प्रवेश करता यावा. पण जेव्हा एखादा आत्मा वेळेच्या आधी निघून जातो तेव्हा मात्र खूप दुःख होतं.

तीजेनं पुढे लिहिलं, जे मित्र नेहमीच एकमेकांच्या सोबत असतात. एकमेकांच्या संपर्कात असतात. मग हेच मित्र जेव्हा त्याच्या आयुष्यात एखादी कठिण परिस्थिती येते त्यावेळी मदत मागण्याऐवजी असं टोकाचं पाऊल का उचलतात. आता डोक्यात अनेक प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. तो ज्याप्रमाणे आशावादी आणि उत्साही होता. त्याच्या याच गोष्टी नेहमीच स्मरणात राहतील.

View this post on Instagram

There is a cycle that souls follow - some have to leave the earth so new ones can come. But it shakes you and leaves you numb when a soul leaves before its time. When a friend goes like this, you wonder if being more connected could have saved them. But when you ARE regularly in touch, it's confusing. You wonder what could have gone so wrong for this to happen? Why didn't they say anything? Reach out? There will be a hundred questions, none that we have answers to. Dearest @itsme_kushalpunjabi, this is so heartbreaking. You were always so warm, wonderful, vibrant. Our children played together, you always told us how much you loved being a #Dad. 😔 Never saw this coming! I wish you'd have said something, anything. You were always so positive. You will be so missed, dear friend. Prayers/strength to your family, especially your sweet little boy. 🙏 We love you always #Kushlani. ❤️ #RIP

A post shared by Teejay Sidhu (@bombaysunshine) on

पोलिसांना कुशलच्या घरात एक सुसाईड नोट सापडली होती. या दीड पानी नोटवरुन दिसून येत की तो नैराश्यग्रस्त परिस्थिती होता. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यानं या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. तसेच त्यानं त्याची सर्व संपत्ती 2 भागात वाटली आहे. त्याच्या एकूण संपत्तीपैकी 50 टक्के भाग हा त्याच्या आई-वडीलांच्या नावे करण्यात आला आहे तर उरलेला 50 टक्के भाग हा त्याचा 3 वर्षाचा मुलगा कियानच्या नावे करण्यात आला आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळाच्या सर्वच व्यक्तीना धक्का बसला आहे.

दरम्यान टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कुशलचा जवळचा मित्र चेतननं सांगितलं, 'हो त्यानं आत्महत्त्या केली. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद होत असतं तिच्यापासून वेगळं होण्याच्या दुःखामुळे तो मागच्या काही दिवसांपासून खूप निराश आणि आजारी सुद्धा होता. काही दिवसांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यानं या गोष्टींचा उल्लेख करत खूप डिस्टर्ब असल्याचंही सांगितलं होतं. मी त्याची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो असं काही करेल असा मी कधीच विचार केला नव्हता.'

कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. 'लव मॅरेज', 'सीआयडी', 'जिंदगी विन्स' या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं.

First published: December 29, 2019, 2:39 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading