Home /News /entertainment /

बहुचर्चित ‘भिरकीट’चा ट्रेलर रिलीज, यादिवशी भेटीला येणार हास्यवादळ

बहुचर्चित ‘भिरकीट’चा ट्रेलर रिलीज, यादिवशी भेटीला येणार हास्यवादळ

सध्या अनेक मराठी चित्रपट (Marathi Cinema) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 'भिरकीट' नावाचं हास्य वादळ येत आहे.

    मुंबई, 27 मे-  सध्या अनेक मराठी चित्रपट   (Marathi Cinema)  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 'भिरकीट' नावाचं हास्य वादळ येत आहे. 'भिरकीट'  (Bhirkit)  या चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून हे वादळ 17 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आला आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहेत. ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते. आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात," 'भिरकीट' ही गावच्या मातीची कथा आहे. राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी , विनोद हे संपूर्ण रस या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसाच चित्रपटाला देखील असाच भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. ‘भिरकीट’चा ट्रेलर आज प्रदर्शित होत आहे.संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. (हे वाचा:VIDEO: मराठी अभिनेता आपल्या लेकीसाठी शोधतोय नाव, पाहा तुम्हाला काही सुचतंय का? ) क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.या चित्रपटाचे ,छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांनी केलं आहे. तर या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Upcoming movie

    पुढील बातम्या