Home /News /entertainment /

काय गाडी, काय ट्राफिक काय फोटो...ओक्केमधी हाय का नाय; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

काय गाडी, काय ट्राफिक काय फोटो...ओक्केमधी हाय का नाय; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिके, भाऊ कदम (Bhau kadam), आणि विजू माने (Viju mane)या तिघांचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  मुंबई, 30 जून : आपल्या विनोदी शैलीनं खळखळून हसवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal badrike). कुशलनं आपल्या वेगळ्या शैलीनं चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं असं घर बनवलं आहे. कुशलच्या प्रत्येक भूमिकेला, काॅमेडीला चाहते दाद देताना दिसतात. कुशल सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. अशातच कुशलचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कुशल बद्रिके, भाऊ कदम (Bhau kadam), आणि विजू माने (Viju mane) या तिघांचा हा फोटो असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कुशल बद्रिके, भाऊ कदम, आणि विजू माने या तिघांचा पोटो तर व्हायरल होत आहेच मात्र या फोटोपेक्षा कॅप्शन (Photo caption)जास्त लक्ष वेधून घेत आहे. "काय गाडी काय ट्राफीक काय फोटो..ओक्केमधी हाय का नाय." अशा आशयाचं कॅप्शन या फोटो दिलं आहे. सध्या हे असं कॅप्शन ट्रेंडिंग मधे दिसत आहे. राजकीय वातावरण तापलेलं असताना राजकीय नेत्यानं केलेल्या एका वाक्यावरुन सध्य़ा असं कॅप्शन ट्रेंडिंगमधे आलंय. "काय ती झाडी , काय तो डोंगार, काय ती हाटील...सगळं ओक्केमधी हाय", यावरुन सध्या सगळेच अशा प्रकारचे कॅप्शन टाकत आहे. एवढंच काय तर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे. असंच काहीचं ट्रेंडिंग कॅप्शन कुशल बर्दिके, विजू माने यांनी दिलंय. हेही वाचा - तितिक्षाने शेअर केला भाच्यासोबतचा क्युट फोटो; तुम्ही पाहिलंत का खुशबू तावडेच्या लेकाला? तिघांच्या फोटोवर सध्या लाईक्स चा वर्षाव होत असून अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. तुम्ही तिघं एकत्र म्हणजे सगळं ओक्केच हाय, अशा प्रकारच्या अनेक कमेंट येत आहे. तिघांना एकत्र पाहून चाहते खूप आनंदी आहेत. दरम्यान, कुशलचा लवकरच झोलझाल हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अधिकच उत्सुक आहेत.
  कुशलनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी भूमिकेविषयी सांगितलं आहे. 'मला ना कायम एक व्हिलन करायचा आहे, तशा भुमिकाही येतात, लुक बिक एकदम खत्री, पण त्या प्रेक्षकांच मनोरंजन करणाऱ्या असतात. विनोदी असतात. त्यातलीच एक भुमिका ही Don 'ददाऊद'.  1 जुलैला येतोय तुमचं मनोरंजन करायला सिनेमाघरात' 'झोलझाल.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Social media

  पुढील बातम्या