मुंबई, 10 मार्च- कुशल बद्रिके त्याच्या कॉमेडी टाईंमगमुळे सर्वांना पिरचीत आहेच. पण अलीकडे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट देखील तितक्याच बोलक्या असतात. त्याची प्रत्येक पोस्ट कशाचा कशाचा दाखला देत असते. चाहते देखील त्याच्या या शैलीचे कौतुक करताना दिसतात. आता होळीनिमित्त त्यानं एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. कुशलच्या पोस्ट इतकाच फोटो देखील बोलका आहे.
कुशल बद्रिकेनं होलिका दहनाचा एक फोटो पोस्ट करत म्हणतो की, आपल्या सगळ्यांच्या आत काही ना काहीतरी जळत असतं, खूप त्रासदायक असं… पृथ्वीच्या पोटातला लावा जसा धगधगत असतो ना अविरत, तेवढं भयंकर. कधीकधी वाटतं ही आग वणवा होऊन संपवून टाकील सगळं आणि हाती राहिल ती नुसती “राख”नात्यांची, स्वप्नांची.
वाचा-'नको नको त्या नावांनी बोलावलं', भारती सिंगने व्यक्त केलं बॉडी शेमिंगचं दुःख
पण आपण त्या राखेतून जन्म घेणारे “Phoenix पक्षी” आहोत. मृत्युपल्याड स्वप्न शोधणारे, रोज अस्ताला जाऊन पुन्हा उदयाला येणारे “सुर्य” आहोत आपण. आपल्याला जाळून टाकण्याची ताकद ह्या आगीत नाही ती आपल्या तेजात विलिन होऊन संपून जाणारी आहे . (सुकून)
View this post on Instagram
कुशलच्या या पोस्टवर असंख्य कमेंट देखील आल्या आहेत. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, या वाक्यातून सर्वांच्या मनातील भावभावनांना वाट मोकळी करून दिलीस.... सत्य शब्दात उतरवण्याची हिम्मत लागते,ते तू केलंस 😍😍❤️ तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, खूप छान लिहिले आहे. तर आणखी एकानं म्हटलं आहे की,कॅप्शन खूप छान आहे दादा..अशा असंख्य कमेंट आल्या आहेत. कुणी त्याच्या लिखाणाचं कौतुक केलं आहे तर कोण म्हणत आहे असं गंभीर काही लिहित जाऊ नकोस, आम्हाला सवय नाही.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले होते. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.