Home /News /entertainment /

Kunjika Kalvit: 'ती परत आलीये' फेम अभिनेत्री घेतेय सुट्ट्यांचा आनंद, शेअर केली भन्नाट शायरी

Kunjika Kalvit: 'ती परत आलीये' फेम अभिनेत्री घेतेय सुट्ट्यांचा आनंद, शेअर केली भन्नाट शायरी

ती परत आलीये फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट मस्त फिरायला गेली असून तिच्या रिसेन्ट इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.

  मुंबई 22 जून: झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aliye) मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली एक अभिनेत्री (Kunjika Kalvit) कुंजिका काळवीट. या मालिकेनंतर सुद्धा कुंजिकाचा चाहतावर्ग तसाच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कुंजिका सध्या एका खास कारणाने बरीच चर्चेत आली आहे. कुंजिका सध्या water baby होत कोकणातल्या समुद्राचा आनंद घेताना दिसत आहे. कुंजिका व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत कोकणात फिरायला गेल्याचं (Kunjika Kalvit Vacation) तिच्या रिसेन्ट इन्स्टाग्राम पोस्टवरून समजत आहे. तिने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या या छोट्याशा ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ती असं लिहिते, “जब लहरों से डर खत्म हो जाता हैं, कमबख़्त इश्क शुरू हो जाता हैं।फिर लाख बुलाए किनारे इन्हें, दरिया का हो कर रह जाता हैं” तिने एका खास शायराना अंदाजात आपली पोस्ट लिहिली आहे. सुट्टीवर जाऊन तिच्या बुद्धीला एक वेगळीच चालना मिळाल्याचं दिसत आहे. याचा अर्थ असा की, “जेव्हा लाटांचं भय संपत तेव्हा वेड प्रेम सुरु होतं, मग लाख किनाऱ्याने बोलावू दे, सागराचा होऊन राहतो’
  तिच्या या खास शायराना अंदाजावर चाहते भलतेच खुश झाले आहेत. फोटोवरून तिला समुद्रात जायला खूप आवडत असं समजत आहे. ही तिची happy place आहे असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. कुंजिकाचा हा beach वरचा एन्जॉय करतानाच दिलखुलास फोटो खूप पसंत केला जात आहे. हे ही वाचा- फिल्म साईन करण्याआधी तुमचे लाडके Bollywood कलाकार करतात 'या' DEMANDS कुंजिकाचा करिअर गर्फ एकदम खास राहिला आहे. मटा श्रावण क्वीनचा 'किताब मिळवल्यानंतर ती आजच्या पिढीचा एक चेहरा बनली. आजच्या तरुण रक्ताच्या कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. तिच्या स्वामींनी मालिकेतील पात्राचं कौतुक झालं. आणि त्यानंतर काहीच काळात तिला सगळ्यांनी ‘ती परत आलीये’ मालिकेत पाहिलं. कुंजिका सध्या कोणत्या प्रोजेक्टचा भाग नसली तरी तिला येत्या काळात पुन्हा बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Tv actress, Zee Marathi

  पुढील बातम्या