मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kunjika Kalvit: अभिनेत्री कुंजिकानं स्वत:च्या हातानं कशी घडवली बाप्पाची सुंदर मुर्ती; पाहा VIDEO

Kunjika Kalvit: अभिनेत्री कुंजिकानं स्वत:च्या हातानं कशी घडवली बाप्पाची सुंदर मुर्ती; पाहा VIDEO

अभिनेत्री कुंजिका काळवीटनं यंदा तिच्या हातानं तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवली आहे. बाप्पाची मुर्ती घडवतानाचा एक व्हिडीओ देखील तिनं शेअर केला आहे.

अभिनेत्री कुंजिका काळवीटनं यंदा तिच्या हातानं तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवली आहे. बाप्पाची मुर्ती घडवतानाचा एक व्हिडीओ देखील तिनं शेअर केला आहे.

अभिनेत्री कुंजिका काळवीटनं यंदा तिच्या हातानं तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवली आहे. बाप्पाची मुर्ती घडवतानाचा एक व्हिडीओ देखील तिनं शेअर केला आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 1 ऑगस्ट: ती परत आलीये, स्वामिनी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळवीट. एपिलोग हा कुंजिकाचा नवा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्री सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. कुंजिका ही मुळची मुंबईची आणि मुंबईतही गिरगावची. जिथून गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्या गिरवाची लेक असलेल्या कुंजिकासाठी गणेशोत्सव फारचं खास असतो. कुंजिकाच्या घरी देखील दरवर्षी बाप्पांचं आगमन होतं. यावर्षीचं कुंजिकाच्या घरच्या  बाप्पाचं आगमन काहीसं खास असणार आहे कारण अभिनेत्रीनं स्वत:च्या हातानं बाप्पाची मुर्ती घडवली आहे. तिनं ही मुर्ती कशी घडवली याचा एक सुंदर व्हिडीओ देखील तिनं शेअर केला आहे. अभिनेत्री कुंजिकाच्या घरचा गणपती दरवर्षी गिरगावातील प्रसिद्ध ख्यातनाम मूर्तिकार मादुस्कर गणपती यांच्याकडे तयार केला जातो. मात्र यावर्षी मादुस्करांनी नवी संकल्पना राबवत कुंजिकाच्या घरचा गणपती तिच्याकडून घडवून घेण्याचा प्रयत्न केला. ही संक्लपना कुंजिकालाही आवडल्यानं तिनं देखील मोठ्या उत्साहात बाप्पाची मुर्ती तयार केली.  मादुस्कर यांनी ही कल्पना सुचवली आणि बाप्पाने ती प्रत्ययास आणून घेतली. हेही वाचा - Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडनं सुरू केली वादनाची तयारी; ढोल वाजवतानाचा दमदार VIDEO व्हायरल कुंजिकानं तिचा गणपतीची मुर्ती घडवतानाचा व्हिडीओ शेअर करत सुंदर पोस्ट लिहिली आहे.तिनं म्हटलंय,  'साध्या मातीला येणारं देवपण श्रध्देने जागृत होतं. त्या मूर्तीचं तेज म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीकाराने कलेपोटी त्यात फुंकलेले प्राण! कलेचं सौंदर्य समृद्ध असतं त्यात आव नाही तर असतो तो निर्मळ भाव'.
तिनं पुढे लिहिलंय, 'गणेश मादुस्कर यांच्या मार्गदर्शनाने मी हि मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाची जाण ठेऊन इको-फ्रेंडली लाल मातीचा वापर केला आहे. त्याच्या साच्यांपासून, त्याच्या हात-पायाला आकार देणे, त्याच्या आसनासाठीचे सिहांसन, त्याच्या हातावरचा मोदक, त्याचे भावपूर्ण, तेजस्वी पण अतिशय प्रेमळ डोळे हे सगळं साकारताना आपल्या हातून देव घडतोय ह्याचं खूप अप्रूप वाटलं'. अभिनेत्री कुंजिकाचा एपिलोग हा सिनेमा नुकताच यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. त्याचप्रमाणे कुंजिका लवकरचं अभिनेता अंकित मोहनबरोबर नव्या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कुंजिकानं तिचा गळ्यात मंगळसूत्र घातलेला फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन कुंजिकानं गपचूप लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कुंजिकाला पुन्हा नव्या रुपात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही आहेत.
First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या