Coronavirus : अभिनेत्री 8 तासांपासून बघत आहे डॉक्टरांची वाट, BMC ने नेलंय चेकअपसाठी

Coronavirus : अभिनेत्री 8 तासांपासून बघत आहे डॉक्टरांची वाट, BMC ने नेलंय चेकअपसाठी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून महाराष्ट्रात हजाराचा आकडा पार केला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबईत खबरदारी घेण्यात येत आहे. यातच बीएमसीने अभिनेत्री कुनिका लाल यांच्यासह सात ते आठ लोकांना चेकअपसाठी नेलं होतं. मात्र त्यांना जवळपास आठ तास वाट बघत बसावं लागलं असल्याची माहिती अभिनेत्री कुनिका यांनी दिली.

न्यूज 18 इंडियाशी बोलताना अभिनेत्री कुनिका लाल यांनी सांगितलं की, त्या शेवटचं दिल्लीला गेल्या होत्या आणि आता बीएमसीच्या पथकाने त्यांना हॉटेलमध्ये आणलं आहे. काही लोकांना इथं बऱाच वेळ झालं ठेवलं आहे. मात्र, बीएमसीच्या टीमचं म्हणणं आहे की, डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर घरी सोडलं जाईल.

कुनिका लाल म्हणाल्या की, हॉटेलमध्ये डॉक्टरांची वाट बघत आहे. बीएमसीच्या टीमला वारंवार सांगूनही अजुनही बंद हॉटेलमध्ये डॉक्टरांच्या पथकाची वाट बघत असल्याची माहिती त्यांनी दिली. अद्यापही डॉक्टरांचे पथक अलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा : कोरोनामुळे देशातल्या सर्वात लहान 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

अंधेरीती लोखंडवाला भागात कुनिका लाल राहतात. त्यांना घरातून निघून आठ तास झाले. बीएमसीने त्यांना हॉटेल मिड टाउनमध्ये आणलं आहे. याबाबत कुनिका यांनी सांगितलं की, त्यांची तब्येत ठीक आहे पण डॉक्टरांची वाट बघत असून अजुन कोणीही डॉक्टर आलेले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावरूनही हा बीएमसीचा बेजबाबदारपणा असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा : नोएडातल्या झोपडपट्टीत 200 जण कोरोना संशयीत, सर्वांना केलं क्वारंटाइन

संपादन - सुरज यादव

First Published: Apr 7, 2020 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading