'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शहा काळाच्या पडद्याआड

'जाने भी दो यारो'चे  दिग्दर्शक कुंदन शहा काळाच्या पडद्याआड

ते 69 वर्षाचे होते. त्यांनी राहत्या घरातच आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

मुंबई,07 ऑक्टोबर:जाने भी दो यारोचे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन झालं आहे. ते 69 वर्षाचे होते. त्यांनी राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला.

'जाने भी दो ना यारो' ,'कभी हाँ कभी ना' सारख्या दर्जेदार सिनेमांचं  दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्यांचं हार्ट अटॅकने निधन झालं आहे.नुक्कड आणि वागळे की दुनिया या मालिकाही त्यांनी छोट्या पडद्यावर दिग्दर्शीत केल्या. जाने भी दो यारो हा त्यांचा सिनेमा हिंदी सिनेमातल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी  एक ओळखला जातो. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शनाचं  प्रशिक्षण घेतलं होतं.

त्यांनी दिग्दर्शीत केलेला पी से पीएमतक हा शेवटचा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झाला होता.

First published: October 7, 2017, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading