मुंबई, 05 डिसेंबर : टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो 'कुमकुम भाग्य' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. काही महिन्यांआधीच पूजा आई झाली. पूजानं एका मुलीला जन्म दिला. आई होण्याचं सुख अनुभव असताना आणि पूजाचं करिअर सध्या व्यवस्थित सुरू असताना तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूजाच्या वडिलांचं निधन झालं आहे. पूजानं सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर करत ही माहिती दिल आहे. वडिलांच्या निधनानं पूजा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. वडिलांच्या जाण्यानं दु:खात असलेल्या पूजानं वडिलांसाठी इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री पूजाच्या वडिलांचं काही दिवसांआधीच निधन झालं. पूजानं 4डिसेंबरला वडिलांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहित दु:ख व्यक्तेलं. तिनं म्हटलंय, बाबा तुमच्या आत्म्यास शांती मिळो. मला माहिती आहे तुम्ही जिथे आहात तिथे चांगल्या ठिकाणी आहात. तुमची खूप आठवण येईल. संदीप, सना, पूजा, नील आणि आकाश. पूजाची ही पोस्ट वाचून अनेक कलाकारांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच पूजाला दु:खातून सावण्यासाठी धीर देखील दिला आहे.
हेही वाचा - अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात, नवरा सोहेलसोबतचे फोटो व्हायरल
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीमुळे तिनं कामातून ब्रेक घेतला आहे. तिला काही दिवसांआधी मुलगी झाली. त्यामुळे सध्या तिनं कामातून ब्रेक घेऊन मुलीकडे लक्ष केंद्रित केलं आहे. कुमकुम भाग्य ही पूजाची शेवटची मालिका ठरली. त्यानंतर ती तिचं आईपण एन्जॉय करत आहे. मात्र अशातच आता तिचे वडील हे जग सोडून गेले आहेत.
पूजाच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर पूजानं एम टीव्हीच्या रोडीज या शोमधून एंट्री केली.त्यानंतर एक दुसरे से करते हैं प्यार हम या मालिकेत तिनं काम केलं. ही मालिका तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर चंद्रकांता, चंद्र नंदिनी, दिल ही तो हे. कसोटी जिंदगी की, कुमकुम भाग्य सारख्या मालिकेत तिनं कामं केली. कहने को हमसफर हे या सीरिजमधून तिनं ओटीटीवर पदार्पण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News