Home /News /entertainment /

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं झालं निधन

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं झालं निधन

'कुमकुम भाग्य' (Kumkum Bhagya) आणि'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) फेम अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचं निधन झालं आहे.

  मुंबई,7 फेब्रुवारी-   एकीकडे लता मंगेशकर   (Lata Mangeshkar)  यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. तर दुसरीकडे 'कुमकुम भाग्य'   (Kumkum Bhagya)   आणि 'बिग बॉस 14'   (Bigg Boss 14)  फेम नैना सिंहसाठीसुद्धा  (Naina Singh)   हा काळ आणखी कठीण आहे. नैना सिंहच्या वैयक्तिक आयुष्यात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नैना सिंहच्या आईचं निधन   (Nainas Mother Passes Away)  झालं आहे. अभिनेत्रीने ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली आहे. यानंतर नैनाचे चाहते तिला धीर देत आहेत. नैनाने तिच्या आईसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच अभिनेत्रीने एक मोठी पोस्ट लिहिली आहे, जी वाचून कोणीही भावूक होईल. या पोस्टमध्ये नैनाने तिच्या आईसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं- 'आई प्लीज परत ये... माझं मन सुन्न झालं आहे, माझं मन रडत आहे आणि माझे डोळे थकले आहेत. मला सध्या काय वाटत आहे ते कोणतंही शब्द त्याचं वर्णन करू शकत नाहीत. मी ते शब्दात मांडण्याचा विचारही करू शकत नाही'. अभिनेत्रीने पुढं लिहिलं आहे, 'तू चांगल्या ठिकाणी आहेस या विचाराने मला आराम वाटतो, पण तुझ्याशिवाय मी काय करणार. तुझी लहान मुलगी तुला खूप मिस करत आहे. मला तुझी नेहमी आठवण येईल. आईपेक्षा जास्त तिच्या मुलावर कोणीही प्रेम करू शकत नाही. मला तुझे प्रेम, तुझी काळजी, तुझी काळजी आणि तुझं ओरडणं देखील आठवेल. आपण एकत्र केलेल्या सर्व गोष्टी मला आठवतात'.
  View this post on Instagram

  A post shared by Naina Singh (@nonaberrry)

  'रात्री उशिरापर्यंत बाहेर राहिल्यानंतर घरी यायला कोण विचारेल? माझ्यावर कोण ओरडणार? जेव्हा मला सल्ल्याची गरज असेल तेव्हा मी कोणाकडे पाहणार? गरज असताना मी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडणार? मी आनंदाच्या गोष्टी कोणाला सांगणार? माझ्यासाठी जगातील सर्वोत्तम जेवण कोण बनवणार? मी सण कोणासोबत साजरे करणार? माझ्यासाठी अशा छोट्या भेटवस्तू कोण विकत घेईल, जे पाहून मला आनंद होईल.' 'बेरी अजून तुझी घरी येण्याची वाट पाहत आहे. तू मला नेहमीच आयुष्याला सामोरे जाण्याची हिंमत दिलीस आणि आज मी जी आहे ती फक्त तुझ्यामुळे. मी नेहमीच तुझी धाडसी मुलगी असेन. मला माहित आहे की तू माझ्यावर वरून हसशील आणि नेहमी माझं संरक्षण करशील. माझ्या हृदयातील ही पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही.'' नैनाच्या पोस्टवर कमेंट करताना यूजर्स तिला धीर देत आहेत आणि नैनाच्या आईला श्रद्धांजली वाहात आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या