मुंबई 22 जून: मराठीत एक उभारता चेहरा म्हणून क्षितीश दातेकडे (Kshitish Date) पाहिलं जातं. मागच्या काही काळात क्षितीशच्या अभिनयाने सगळे प्रेक्षक भारावून जात असल्याचं स्पष्ट होत आहे. क्षितीशने नुकतीच साकारलेली भूमिका अगदी सगळ्यांच्याच पसंतीस पडली होती. क्षितीश सध्या एका नव्या गोष्टीमुळे खूप चर्चेत आला आहे.
राज्यात चाललेल्या राजकीय बंडाळीबद्दल क्षितीशने आपली भूमिका घेत मत स्पष्ट केलं आहे. क्षितीश नुकत्याच आलेल्या ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपटात मा. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेत दिसला होता. त्यांच्यासारखं हुबेहूब रूप, त्यांची देहबोली सगळीच क्षितीशने आत्मसात केली होती. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला प्रचंड प्रमाणात नावाजण्यात सुद्धा आलं होतं.
गेल्या काही दिवसात राज्यात ती राजकीय भूकंपाची परिस्थिती ओढवली आहे त्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचं नाव वारंवार येताना दिसत आहे. राज्यातील चालू परिस्तिथीपासून कोणीही अनभिद्न्य नसल्याने त्यावर वेगवेगळी मतं आणि अभ्यास मांडला जात आहे. असतंच काही नेटकऱ्यांनी चालू परिस्थितीत सुद्धा मिम्स बनव्यापासून सुट्टी घेतली नसल्याचं समोर येत होतं. सोशल मीडियावर राजकीय परिस्थितीवर मिम्सच्या माध्यमातून चेष्टा होताना दिसत आहे. शिवसेनेतील अनेक नेत्यांवर, स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा अनेक गमतीशीर मिम्स सध्या फिरताना दिसत आहेत.
अशातच एका वृत्तपत्राने सुद्धा या मिम्सला आपल्या बातमीत अंतर्भूत केल्याने क्षितीश चांगलाच भडकलेला दिसतो आहे. क्षितीशचा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतला फोटो असलेलं हे मीम असून यात “थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं लिहिलेलं आहे. यावर क्षितीशन सोशल मीडियावर स्टोरी टाकत असं लिहिलं आहे, “हे असं छापणं चूक आहे. राज्यात मोठी उलाढाल चालू असताना चेष्टेने मिम्स येणं वेगळं आणि ते वर्तमानपत्रात छापून येणं वेगळं” असं म्हणत क्षितीशने आपलं मत व्यक्त केलं आहे.
राज्यात चालू असणाऱ्या परिस्थितीचं गांभीर्य सर्वाना असलं पाहिजे हे या वक्तव्यातून समोर येतं.
नेमक्या कोणत्या वृत्तपत्रात यासंदर्भातील बातमी छापून आली याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. त्यामुळे News18 लोकमत याची पुष्टी करीत नाही.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.