मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करण जोहरच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज होताच हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट; म्हणाला 'आपली टायग्रेस...'

करण जोहरच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज होताच हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट; म्हणाला 'आपली टायग्रेस...'

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील झळकणार आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील झळकणार आहे.

करण जोहरला इंडस्ट्रीत 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पण या चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये रणवीर आलियासोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 मे : चित्रपट निर्माता करण जोहरने आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघांचा लूक चाहत्यांना आवडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता करण जोहरला इंडस्ट्रीत 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पण या चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये रणवीर आलियासोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

आलिया आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असणाऱ्या  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील झळकणार आहे. समोर आलेल्या पोस्टमध्ये क्षिती या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारणार असल्याचं दिसतंय. तिच्यासोबतच या पोस्टरवर धर्मेंद्र, जया बच्चन यांसारखे जेष्ठ कलाकार देखील झळकत आहेत. समोर आलेलं पोस्टर पाहून नेटकरी क्षितीचं कौतुक करतायत. त्यासोबतच क्षितीचा नवरा आणि मराठी अभिनेता हेमंत ढोमेने देखील बायकोच्या कौतुक करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून हेमंत ढोमे ओळखला जातो. हेमंत कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्या हटके पोस्टने तो सगळ्यांचं लक्ष वेधत असतो. हेमंत ढोमेने नुकतीच क्षितीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Karan Johar: 'या' सुपरस्टारच्या बायकोवर करण जोहरला जडलं होतं प्रेम; दिग्दर्शकाने सगळ्यांसमोर केलेला खुलासा!

हेमंत ढोमेने त्याच्या इन्स्टाग्रामवर बायको क्षिती जोगसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. क्षिती जोगच्या या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत हेमंतनं लिहिलंय कि, 'आपली टायग्रेस मोठी झेप घेतेय! मला तुझा खूप अभिमान वाटतोय.'  हेमंतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.

हेमंत ढोमेने ही पोस्ट शेअर करताच पोस्टवर अनेर प्रतिक्रिया येताना दिसत आहे. चाहते कमेंट करत क्षिती जोगला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. क्षितीला या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आता आतुर झाले आहेत.

क्षिती जोग ही अभिनेत्री असून तिनेही आपल्या दमदार अभिनयाची छाप मराठी आणि हिंदी प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. क्षितीचे नवरा, आई-वडिलादेखील मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहेत. क्षितीचा चाहता वर्गही बराच मोठा असून तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. क्षितीने याआधी देखील काही हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होतं. पण इतक्या मोठ्या बॅनरचा चित्रपट मिळणं ही सोप्पी गोष्ट नाही. त्यासाठीच चाहते क्षितीचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी  रिलीज होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment