मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tumchi mulgi ky karte: दोन जिवाभावाच्या मैत्रिणी येणार एकत्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एन्ट्री

Tumchi mulgi ky karte: दोन जिवाभावाच्या मैत्रिणी येणार एकत्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एन्ट्री

सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 22 सप्टेंबर : सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. वेगळा विशष, वेगळ्या धाटणीची मालिका असल्याने प्रेक्षकांनीही मालिकेना भरभरुन प्रेम दिलं. अशातच या मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत असतात. त्यात भर घालत या मालिकेत रुईया कॉलेजमधून एकत्र नाटक, एकांकिका करत आज कलाविश्वात उत्तम अभिनेत्री असलेल्या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर या मालिकेदरम्यान पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ही मैत्रीणींची जोडी दुसरी तिसरी कोणती नसून अभिनेत्री मनवा नाईक आणि अभिनेत्री क्षिती जोगची आहे. हेही वाचा -  'या' दिवशी रिलीज होणार सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा DoubleXL; टीझरने वाढवली उत्सुकता तुमची मुलगी काय करते?' मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक या मालिकेत असून मनवाच्या कॉलेजमधल्या जोडीदाराची आता एण्ट्री होणार आहे. क्षिती जोग या मालिकेत पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र काम करण्याची मिळालेली संधी मनवा आणि क्षिती यांना पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेजलाईफच्या फ्लॅशबॅकमध्ये नेईल यात शंकाच नाही. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
दरम्यान, मनवा नाईक आणि क्षिती जोग दोघीही महाविद्यालयापासून सोबत आहेत. त्यांची खूप वर्षांची मैत्री असून त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्साही असतात.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, TV serials

पुढील बातम्या