मुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण Krystle Dsouza | Mumbai Rain | Karan Patel |

मुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण Krystle Dsouza | Mumbai Rain | Karan Patel |

Krystle Dsouza | Mumbai Rain | Karan Patel | बिग बी यांच्या घराबाहेर प्रचंड पाणी साचलं होतं. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरू शकतं.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै- एकीकडे देशातील काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा केली जात आहे तर काही ठिकाणी पावसाने उच्छाद मांडला आहे. मुंबईमध्ये चाकरमान्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. सर्वसामांन्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांनाच याचा फटका बसला आहे. आता टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने आपला अनुभव शेअर केला आहे. क्रिस्टलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिस्टल म्हणते की, ती पावसात अडकली होती. पण करण पटेलने योग्यवेळी येऊन तिची मदत केली आणि तिला घरी घेऊन गेला. या दरम्यान तिची गाडीही बिघडली होती. क्रिस्टलने करणच्या घरातून एक व्हिडिओ शूट केला यात तिने करणला ‘एंजल’ म्हटलं. ज्या जागी क्रिस्टल अडकल होती ती जागा करणच्या घरापासून फार जवळ होती. जेव्हा तिने करणकडे मदत मागितली तेव्हा करण अवघ्या काही मिनिटांत तिथे पोहोचला.

दिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण

हिमेश रेशमियाच्या गाडीला अपघात, ड्रायव्हर जखमी

मुंबईमध्ये सध्या जोराचा पाऊस सुरू आहे. याआधी बिग बी यांच्या घराबाहेर प्रचंड पाणी साचलं होतं. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरू शकतं. ज्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांचं घर आहे त्याच ठिकाणी अनेक फिल्मस्टार राहतात. अक्षय कुमार, हृतिक रोशन यांची घरंही याच परिसरात आहेत. एवढंच नाही तर पृथ्वीराज कपूर यांनी सुरू केलेले पृथ्वी थिएटरही याच भागात आहे.

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

First published: July 2, 2019, 4:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading