काय आहे अभिनेत्री क्रिस्टल डिसुझा-हार्दिक पांड्यामधील नातं, 'त्या' फोटोवर नेटीझन्स म्हणतात...

काय आहे अभिनेत्री क्रिस्टल डिसुझा-हार्दिक पांड्यामधील नातं, 'त्या' फोटोवर नेटीझन्स म्हणतात...

क्रिस्टलनं नुकताच क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 5 मे : बॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टल डिसुझा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. आताही क्रिस्टलसोबत काहीसं असंच झालं आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. क्रिस्टलनं नुकताच क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावरून युजर्सनी क्रिस्टलला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

क्रिस्टलनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हार्दिक सोबतचा फोटो शेअर करत त्याला, 'मेरे भाई जैसा कोई हार्डिच नहीं है.'असं कॅप्शन दिलं. याशिवाय तिनं या फोटोसाठी Brother from Another Mother असा हॅशटॅगही वापरला आहे. पण हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्याचा हार्दिकवर असलेला राग पुन्हा एकदा उफाळून आला आणि त्यांनी हार्दिक सोबत क्रिस्टललाही ट्रोल करायला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली होती. मात्र या शोदरम्यान महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे या दोघांवरही देशभरातून टीकेची झोड उठली होती. याची शिक्षा त्यांना मिळाली असली तरीही लोक ही गोष्ट पूर्णपणे विसरलेले नाही आणि त्यामुळेच क्रिस्टलच्या या पोस्टनंतर ते भडलेले दिसले.

 

View this post on Instagram

 

Mere Bhai Jaisa Koi Hard ich Nahi Hai . . . . #brotherfromanothermother

A post shared by (@krystledsouza) on

क्रिस्टलची या पोस्टनं पुन्हा एकदा लोकांना कॉफी विथ करणमधील हार्दिकच्या त्या वक्तव्यांची आठवण करून दिली आमि त्यांनी या दोघांवरही टीका करायला सुरुवात केली. एका युजरनं लिहिलं, 'क्रिस्टल तू पहिल्यांदाच त्याला भाऊ म्हटलंस हे खूप चांगलं केलं.' तर दुसऱ्या एका युझरनं, 'चहात जेवढी चहा पावडर घालणं गरजेचं असतं तेवढंच हार्दिकला भाऊ म्हणणं गरजेचं आहे' अशी कमेंट केली.

एका युजरनं तर चक्क हार्दिकच्या रंगावर टीका करत लिहिलं, 'तू वेस्ट इंडिजला का नाही जात.' पण यावेळी मात्र अभिनेता अपारशक्ति खुराना हार्दिक आणि क्रिस्टलच्या मदतीला धावून आला. त्यानं लिहिलं, हार्दिक एक चांगला खेळाडू आहे आणि निदान वर्डकपच्या आधी त्याच्याबाबत अशाप्रकारच्या गोष्टी आपण बोलायला नको. यावर क्रिस्टलनंही आपली प्रतिक्रिया दिली. तिनं लिहिलं, 'लोकांना वाटतं की, ते स्क्रीनच्या मागून काही लिहून इथून बाहेर पडतील.'  हार्दिक सध्या IPLमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असून वर्ल्डकप 2019 साठी त्याची भारतीय संघांत निवड झाली आहे.

'क्वीन' कंगनाला आदर्श मानणाऱ्या 'या' अभिनेत्रीचा करण जोहरनं केला ब्रेन वॉश?

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

First published: May 5, 2019, 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading