मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Krrish 4: सबकुछ हृतिक! हिरो आणि व्हिलन दोन्हीचे रोल करणार रोशन

Krrish 4: सबकुछ हृतिक! हिरो आणि व्हिलन दोन्हीचे रोल करणार रोशन

'कोई मिल गया'चा चौथा सिक्वेल म्हणून Krrish 4 ची चर्चा आहे. भारतीय सुपरहिरोच्या या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे.

'कोई मिल गया'चा चौथा सिक्वेल म्हणून Krrish 4 ची चर्चा आहे. भारतीय सुपरहिरोच्या या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे.

'कोई मिल गया'चा चौथा सिक्वेल म्हणून Krrish 4 ची चर्चा आहे. भारतीय सुपरहिरोच्या या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे.

मुंबई, 14 जानेवारी: चित्रपट निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी काही महिन्यापूर्वी क्रिश-4 (Krrish 4) या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरु असून क्रिश-4 (Krrish 4) हा चित्रपट 'कोई मिल गया' या चित्रपटाचा चौथा भाग असणार आहे. यामध्ये ह्रतिक रोशन( Hrithik Roshan) क्रिश या सुपरहिरोची भूमिका निभावणार आहे. क्रिश-4 (Krrish 4) या चित्रपटात हृतिक दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट मागील वर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु राकेश रोशन यांना कॅन्सर झाल्याने चित्रपट थांबला होता. पण आता याचे काम लवकरच सुरु होणार आहे. स्पॉटबॉयमध्ये समोर आलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटामध्ये हृतिक रोशन( Hrithik Roshan) दोन भूमिका साकारणार असून या चित्रपटाचा हा मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. यामध्ये हृतिक व्हिलन आणि हिरो दोघांच्या भूमिका साकारणार आहे. हृतिक रोशन( Hrithik Roshan) या चित्रपटात व्हिलन आणि हिरोच्या दोघांच्या भूमिक साकारण्यास इच्छुक असल्याने या चित्रपटात तो मुख्य आकर्षण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे ही वाचा- VIDEO Clips बाबत रेणू शर्माच्या वकिलाचा धक्कादायक खुलासा; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?  काही दिवसांपूर्वी हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारित असल्याचे म्हटले जात होते. 'कोई मिल गया' आणि क्रिश-4 (Krrish 4) या दोन्हींचा संगम करण्याची दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांची योजना असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे समोर आली होती. यामध्ये क्रिश म्हणजेच हृतिक आपल्या वडिलांना रोहित मेहरा आणि जादू यांना पुन्हा जिवंत करत असल्याचे या कथानकात दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. Mid Day शी बोलताना सूत्रांनी माहिती दिली होती की, जादूशी संपर्क साधू शकणारा तो एकमेव व्यक्ती असल्याने रोहित हा या कथेतील अविभाज्य भाग आहे. राकेश रोशन यांनी या चित्रपटाची अतिशय उत्तम बांधणी केली असल्याने अनेक पात्र एकमेकांशी खेळती राहतात. हे ही वाचा-राजकीय प्रेमप्रकरणं आणि बरचं काही; धनंजय मुंडेंप्रमाणे कोणते नेते होते चर्चेत? दरम्यान, चित्रपटाच्या निर्मितीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. राकेश रोशन (Rakesh Roshan) सध्याच्या परिस्थितीत नियमांमध्ये शिथिलता येण्याची वाट पाहत आहेत. कारण या चित्रपटाचा काही भाग परदेशात चित्रीकरण करण्याची त्यांची योजना आहे. चित्रपटातील अभिनेत्रीच्या निवडीबाबत चर्चा झाली असून निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे यामध्ये अभिनेत्री कोण असणार याकडे देखील चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
First published:

Tags: Bollywood News, Hritik Roshan

पुढील बातम्या