मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘तू मिळवलंस मित्रा…’; KRK लागला आता सलमानच्या EX वहिनीच्या मागे

‘तू मिळवलंस मित्रा…’; KRK लागला आता सलमानच्या EX वहिनीच्या मागे

केआरकेनं ओढून घेतला नवा वाद; मलायकाचा फोटो शेअर करत म्हणाला....

केआरकेनं ओढून घेतला नवा वाद; मलायकाचा फोटो शेअर करत म्हणाला....

केआरकेनं ओढून घेतला नवा वाद; मलायकाचा फोटो शेअर करत म्हणाला....

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 27 जून: कमाल आर खान उर्फ केआके (KRK) सध्या सलमान खानशी (Salman Khan) पंगा घेतल्यामुळं चर्चेत आहे. त्यानं सलमानच्या खासगी आयुष्यावर टीका केली होती. त्यामुळं सलमाननं त्याला कोर्टात खेचलं. अद्याप ही केस संपलेली नाही त्यामुळं आता त्यानं सलमानची एक्स वहिनी मलायका अरोरावर (Malaika Arora) निशाणा साधला आहे. “अखेर अर्जुन कपूरनं मिळवलंच” असं म्हणत तिची खिल्ली उडवली. अर्थात ही कमेंट काही नेटकऱ्यांना आवडली त्यामुळं त्यांनी KRK ला ट्रोल देखील केलं. अखेर वाढतं ट्रोलिंग थांबवण्यासाठी मग त्यानं आपल्या कमेंटवर स्पष्टीकरण दिलं.

मसाबा गुप्ताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वजन कमी करण्यासाठी दिल्या 5 टिप्स

असं काय म्हणाला केआरके?

“मित्रा अर्जुन तू खरा वाघ आहेस. तुझ्यात हिंमत आहे. अखेर तू तेच केलस जे तुला करायचं होतं. तू मिळवलस मित्रा” अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं. सोबतच अर्जुन आणि मलायकाचा फोटो देखील शेअर केला. मलायका ही सलमान खानचा भाऊ अरबाज खानची घटस्फोटित पत्नी आहे. अर्जुन कपूरमुळं त्यांचा घटस्फोट झाला होता असं म्हणतात. त्यामुळं अर्जुनवर सलमान नाराज आहे. शिवाय अर्जुन आणि केआरकेमध्ये चांगली मैत्री आहे. त्यामुळं अर्जुनच्या निमित्तानं केआरकेनं पुन्हा एकदा सलमान खानला डिवचण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याचं हे ट्विट काही चाहत्यांना आवडलं नाही. त्यामुळं सध्या त्याला ट्रोल देखील केलं जात आहे.

RD Burman Birth Anniversary: आर.डी बर्मन यांना ‘पंचम दा’ का म्हणतात?

वाढतं ट्रोलिंग थांबवण्यासाठी मग केआरकेनं देखील एक ट्विट केलं. “लोक माझ्या ट्विटचा चूकीचा अर्थ का काढतात? मी मलायका नव्हे सिद्धार्थ मल्होत्राच्या बाबतीत म्हणालो होतो. अर्जुननं एक विलन 2 मध्ये सिद्धार्थचा रोल मिळवला त्यासाठी त्याची मी स्तुती करतोय.” असं स्पष्टीकरण त्यानं दिलं. केआरकेचं यापुर्वी मलायका अरोरासोबतही भांडण झालं आहे. तिनं देखील त्याच्यावर टीका केली होती. ते निमित्त साधून त्यानं ट्विट केलं होतं की काय? अशी देखील काही नेटकरी शंका उपस्थित करत आहेत.

First published:

Tags: Arjun kapoor, Malaika arora, Salman khan