नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: स्वयंघोषित सिने समीक्षक कमाल राशिद खान म्हणजे केआरके (KRK) हा सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होतो. सेलिब्रिटींबाबत अपमानजनक गोष्टी बोलण्यासाठीही ओळखला जातो. याच कारणामुळे काही दिवसापुर्वी कमाल राशिद खान याचे ट्विटर हॅंडल ब्लॉक करण्यात आले होते. दरम्यान, केआरके (KRK) ने अभिनेत्री कंगना रणौतवरुन नवा दावा केला आहे.
केआरके (KRK) ने कंगनावर लावले गंभीर आरोप
कंगना आणि करणमध्ये मतभेद आहेत हे सर्वश्रुत आहे. दरम्यान, केआरकेने आपल्या ट्वीट करत कंगना राणावतला 'दीदी' म्हणत ढोंगी म्हटले आहे. तसेच कंगनाने दिग्दर्शक करण जोहर विरोधात बोलण्यास सांगितले असल्याचे केआरके म्हटले आहे. आणि यासंदरर्भात पुरावेदेखील असल्याचे म्हटले आहे. सध्या केआरकेचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे.
Till date no filmwala has asked me to say bad about other filmwala except #KanganaRanaut who asked me to say many things bad about #KaranJohar. I m having her all SMS as proof but I will never public that chat. I have never revealed anyone chat till date n I won’t do it in future
— KRK (@kamaalrkhan) October 1, 2021
केआरकेने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'आजपर्यंत कंगना राणावत वगळता कोणत्याही चित्रपटातील व्यक्तीने मला इतर कोणत्याही चित्रपट निर्मात्याबद्दल वाईट बोलण्यास सांगितले नाही. परंतु कंगनाने मला करण जोहरबद्दल अनेक वाईट गोष्टी सांगण्यास सांगितले आहे. त्याचे सर्व एसएमएस माझ्याकडे पुरावे म्हणून आहेत, पण मी ती चॅट कधीही सार्वजनिक करणार नाही. मी आजपर्यंत कधीही कोणाचे चॅट सार्वजनिक केलेले नाहित. आणि भविष्यातही मी असे करणार नाही.
महेश मांजरेकरांनी गांधी जयंतीदिवशीचं केली 'गोडसे' चित्रपटाची घोषणा
या टीविटनंतर केआरकेने आणखी एक ट्विट केले, "कंगना राणावत थलायवीच्या खराब रिव्यूनंतर जनतेला ज्ञान देत आहे. ती म्हणते की, आपण सर्व देशभक्त बनतो आणि आत्मनिर्भर होण्यासाठी इंग्रजी चित्रपटांऐवजी भारतीय चित्रपट बघा.
परंतु, दीदी आम्ही तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी तुमचा बकवास चित्रपट बघायला तयार नाही. लोक मूर्ख नाहीत. अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.
आली लग्नघटिका समीप! सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO
यापूर्वी त्याने, कंगना इम्रान नावाच्या एका व्यक्तिसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा त्याने केला होता. केआरकेने कंगनाबद्दल एक ट्वीट केले होता आणि काही वेळानंतर ते डिलीटही केले. पण तोपर्यंत त्याच्या या ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते.
या ट्वीटमध्ये केआरकेने कंगना इम्रान नावाच्या व्यक्तिसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे. ट्वीटसोबत कंगनाचे दोन फोटोही त्याने शेअर केले होते. फोटोतील कंगनासोबत दिसणारी व्यक्ती इम्रान आहे, असा केआरकेचा दावा होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Karan Johar