मुंबई 13 जुलै: कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर तो प्रतिक्रिया देताना दिसतो. यामुळे अनेकदा त्याला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी त्याने रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. आलिया-रणबीरचं लग्न होईल पण 15 वर्षातच ते घटस्फोट घेतील अशी विचित्र भविष्यवाणी त्याने केली आहे.
पाहूया नेमकं काय म्हणाला केआरके?
“रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2022 पर्यंत लग्न करतील. पण रणबीर 15 वर्षांच्या आतच तिला घटस्फोट देईल.” अशा आशयाचं ट्विट करत केआरकेनं भविष्यवाणी केली आहे. रणबीर लग्न कधी करणार? हा प्रश्न त्याला आणि आलियाला वारंवार केला जातो. मात्र ते या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतात. या पार्श्वभूमीवर केआरकेचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान या ट्विटवर रणबीरनं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘राजकीय नाटकं चालतात पण आमची नाही’; केदार शिंदेंचा राज्य सरकारला टोला
Prediction 08- Ranbir Kapoor and Alia Bhatt will get married max till end of 2022. But Ranbir Kapoor will divorce her within 15 years after marriage!
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2021
‘बाई, बुब्स आणि ब्रा’; प्रवीण तरडेनं दिला हेमांगी कवीला पाठिंबा
यापूर्वी देखील त्याने रणबीरवर निशाणा साधला होता. “हल्ली रणबीर कपूर कंगना ताईच्या निशाण्यावर आहे. कंगना ताई इशाऱ्या-इशाऱ्यामध्येच रणबीरची पोलखोल करतेय. ती सगळ्या जगाला सांगत आहे, की रणबीर कपूर केवढा मोठा ‘ठरकी’ आहे. मी रणबीरला फक्त इतकचं म्हणेन भावा थोडं तरी स्वत:वर नियंत्रण ठेव. सगळीकडे प्रयत्न करू नकोस.” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Entertainment, Ranbir kapoor