मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KRK चा रणबीर कपूरवर हल्लाबोल, म्हणाला, 'प्रत्येक ठिकाणी ट्राय करणं...

KRK चा रणबीर कपूरवर हल्लाबोल, म्हणाला, 'प्रत्येक ठिकाणी ट्राय करणं...

काही दिवसांपूर्वी KRK ने शाहरुख खानच्या वयावरून ट्वीट करत त्याची खिल्ली उडवली होती.

काही दिवसांपूर्वी KRK ने शाहरुख खानच्या वयावरून ट्वीट करत त्याची खिल्ली उडवली होती.

काही दिवसांपूर्वी KRK ने शाहरुख खानच्या वयावरून ट्वीट करत त्याची खिल्ली उडवली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 जुलै- KRK म्हणजेच कमाल राशीद खान (Kamaal Rashid Khan) सध्या एकापाठोपाठ एक बॉलिवूड (Bollywood) कलाकारांवर हल्लाबोल करत आहे. सध्या तो आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलचं चर्चेत असतो. सलमान खानसोबत पंगा घेतल्यानंतर त्याला गायक मिका सिंगने चांगलेच धारेवर धरलं होतं. त्यानंतर त्याने अभिनेता गोविंदाचं नाव घेत एक ट्वीट केलं होतं. मात्र नंतर त्याने सारवासारव देखील केली होती. यासर्व प्रकरणानंतर आत्ता KRK ने अभिनेता रणबीर कपूरवर (Ranbir Kapoor) निशाना साधला आहे. KRK ने रणबीर कपूरच नाव घेत थेट त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण..,

KRK ने नुकताच एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यानं लिहिलं आहे,’ अलीकडे रणबीर कपूर कंगना ताईच्या निशाण्यावर आहे. कंगना ताई त्याला ईशारा करून काहीतरी सांगत असते. ती इशाऱ्यातून त्याची पोलखोल करत आहे. आणि सगळ्या जगाला सांगत आहे, की रणबीर कपूर केवढा ‘ठरकी’ आहे. मी रणबीरला फक्त इतकचं म्हणेन भावा का सगळीकडे ट्राय करायचं. कधीतरी कंट्रोल करायला शिक’. अशा आशयाचं ट्वीट KRK ने 29 जूनला केलं आहे.

(हे वाचा:पूजा बत्रासारखी हुबेहुब दिसणारी ही तरुणी आहे तरी कोण? आहेत लाखो फॉलोअर्स  )

काही दिवसांपूर्वी KRK ने शाहरुख खानच्या वयावरून ट्वीट करत त्याची खिल्ली उडवली होती. KRK ने ट्वीट करत म्हटलं होतं, ‘शाहरुख खानसुद्धा इतरांसारखं तिच चूक करत आहे, त्यालासुद्धा 56 व्या वर्षी म्हातारा बनण्याची इच्छा नाहीय. तो फक्त अजूनही क्युट रोल करू इच्छितो. आणि हे लोकांना पचणार नाहीय. बॉलिवूड कलाकरांना एक प्रकारचा फोबिया आहे. ते लोक तरुण अभिनेत्रींसाठी तरुण मुलाच्या भूमिका करू इच्छितात’.

(हे वाचा:गुलशन कुमार हत्या प्रकरण: 24 वर्षानंतर High Court चा मोठा निर्णय  )

याआधी KRK ने बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौतवर निशाना साधला होता. त्यावेळी त्यानं म्हटलं होतं, ‘कंगना रनौत आपल्या कारकिर्दीतील 12 वा अपयशी चित्रपट देत आहे. त्याने ट्वीट करत कंगनाच्या चित्रपटाला आधीच फ्लॉप ठरवलं होतं.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut, Ranbir kapoor