कृती सेननने आत्तापर्यंत किती मुलांना केलंय डेट? बहिणीनं केला खुलासा

कृती सेननने आत्तापर्यंत किती मुलांना केलंय डेट? बहिणीनं केला खुलासा

कृती सेनन आणि तिची बहीण नुपूर यांनी एकत्र एक मुलाखत दिली. या मुलाखतीत या दोघींनीही एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले.

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : अभिनेत्री कृती सेनन सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच ती ‘मिमी’ या सिनेमात दिसणार आहे. तिच्या या सिनेमाच पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं असून या सिनेमात ती एका सरोगसी मदरची भूमिका साकरणार आहे. सिनेमाची कथा मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमावरुन घेतलेली आहे. त्यामुळे सध्या कृतीच्या नावाची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृतीनं तिच्या पर्सनल लाइफ बद्दल अनेक गोष्टी शेअर केल्याच पण त्यासोबतच तिची बहीण नुपूर हीनं सुद्धा कृतीबद्दल काही सिक्रेट्सचा खुलासा केला.

कृती सेनन आणि तिची बहीण नुपूर यांनी एकत्र एक मुलाखत दिली. या मुलाखतीत या दोघींनीही एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी नुपूरनं कृतीच्या पर्सनल लाइफ आणि रिलेशनशिपबाबत असे काही खुलासे केले जे कदाचित कुणालाच माहित नसतील. कृतीनं अतापर्यंत किती मुलांना डेट केलं आहे याचं सिक्रेट नुपूरनं उघड केलं. नुपूर म्हणाली, कृतीनं आतापर्यंत  2 मुलांना डेट केलं आहे. तिचं सर्वाधिक काळ टिकलेलं रिलेशनशिप अडीच वर्षांचं होतं. ती खूप रोमँटिक आहे. तिला लव्ह लेटर्स खूप आवडतात मात्र ती 70-80 च्या काळातल्या नाही.

बाबो! एक गरम चाय की प्याली तब्बल 78 हजारांची, अभिनेत्यानं शेअर केलं बिल

आपल्या आवडी विषयी पिकव्हिलाशी बोलताना कृती म्हणाली, मी नेहमीच केमीस्ट्रीकडे लक्ष देते. माझी कोणतीही चेकलिस्ट नाही. कृतीचं बोलणं मध्येच तोडत नुपूर म्हणाली, कृतीला मुलाचं अप्रुव्हल तर घ्यावच लागेल. त्यावर कृती म्हणाली, मला नाही वाटत यानं काही फरक पडणार आहे. मी असं करणार नाही की आधी 10  लोकांचं अप्रुव्हल घेऊ आणि मग निर्णय घेउ की मला या व्यक्तीसोबत राहायचं आहे.

चुकीला माफी नाही! बाप्पाची पूजा करताना सलमान चुकला, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

कृती पुढे म्हणाली, मला प्रामाणिक माणसं खूप आवडतात जी सापडणं सध्या खूप कठीण आहे. सध्याच्या जगात प्रामाणिकपणा खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. मी कधीच माझ्या एक्स बॉयफ्रेंडची मैत्रीण म्हणून राहिलेले नाही. मी असं कधीच केलं नाही. अर्थात तुमचा ब्रेकअप कस झाला यावर सुद्धा ही गोष्ट अवलंबून असते. जर तो दोघांच्या संमती झाला असेल तर मग तुम्ही एकमेकांचे मित्र राहू शकता.

कृतीची बहीण नुपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिनं अशा अनेक कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. जे तिला बॉलिवूड पदार्पणासाठी तयार करतील. एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नुपूरला अभिनयाची खूप आवड आहे. तसेच गाणं हा तिचा छंद आहे. ती संगीतातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु शकते. असं करण तिच्यासाठी बोनस पॉइंट ठरेल.

व्हर्जिनिटी कधी गमावलीस? वायफळ प्रश्न विचारणाऱ्याला बॉलिवूड अभिनेत्रीनं फटकारलं

=============================================================

दबंग सलमानच्या बॉडिगार्डचं पत्रकारासोबत गैरवर्तन; मोबाइल हिसकावला VIDEO VIRAL

Published by: Megha Jethe
First published: September 5, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या