Home /News /entertainment /

'...तेव्हा मी आणि सुशांतने रात्रभर ड्रिंक केलं', क्रिती सेननचा धक्कादायक खुलासा

'...तेव्हा मी आणि सुशांतने रात्रभर ड्रिंक केलं', क्रिती सेननचा धक्कादायक खुलासा

सुशांत सिंह राजपूत, कृति सेनन

सुशांत सिंह राजपूत, कृति सेनन

एका मुलाखती दरम्यान, अभिनेत्री कृति सेननने(Kriti Sanon) दिवंगत अभिनेता सुशांत सिंहसोबतच्या(Sushant Singh Rajput ) आठवणींना उजाळा दिला आहे.

    नवी दिल्ली, 13 जानेवारी: एका मुलाखती दरम्यान, अभिनेत्री कृति सेननने(Kriti Sanon) दिवंगत अभिनेता सुशांत सिंहसोबतच्या(Sushant Singh Rajput ) आठवणींना उजाळा दिला आहे. कृति सेनने सुशांत सिंहसोबत राबता (RAABTA)या चित्रपटात काम केले आहे. ज्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता त्या दिवशी दोघेही खूप उत्सुक होते. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्या दिवशी दोघेही खूप निराश झाले होते. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत कृति सेनॉने ते दोघे तेव्हा कोणत्या मनस्थितीतून गेले होते (Kriti Sanon and Sushant Singh Rajput once drank wine and discussed the failure of their film, Raabta)याचा खुलासा केला आहे. राबता चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर दोघांनी मिळून दुःख व्यक्त केले. त्यावेळी दोघेही खूप निराश झालो होतो. डिप्रेशनमध्ये गेले होता. निराश झाल्याने आम्ही दोघे रात्रभर दारु पित चित्रपटातील चुकिच्या रिव्ह्युबद्दल चर्चा करत बसलो होतो. अशा खुलासा अभिनेत्री कृतिने केला आहे. ती रात्र खूप मजेशीर होती फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत राबता चित्रपटाबद्दल बोलताना , 'जे काही घडत आहे, ते स्वीकारले पाहिजे, ते गरजेचे झाले आहे.'' अशी भावना अभिनेत्रीने यावेळी व्यक्त केली. ती म्हणाली, ती एक रात्र मजेशीर होती. आम्ही सर्व खूप दुःखी होता. नैराश्यात गेलो होता. चाहत्यांकडून मिळणाऱ्या वाईट रिव्ह्यूजवर काय बोलावे काहीच सुचत नव्हते. 'चल यार, मूड खराब आहे' असे म्हणत आम्ही तिथे जाऊन वाईनची बाटली उघडली. आणि पूर्ण मद्यपान केले. 2017 मध्ये दिनेश विजानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला राबता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतने जगाचा निरोप घेतला. सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली होती. टीव्हीच्या लोकप्रिय शो पवित्र रिश्तामधून सुशांतला चाहत्यांमध्ये विशेष ओळख मिळाली. सुशांतच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2013 मध्ये झाली. काई पो चे या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर सुशांतच्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरू झाला होता. एकापाठोपाठ एक, सुशांतने शुद्ध देसी रोमान्स केला आणि नंतर डिटेक्टिव ब्योमकेश. 2016 मध्ये, सुशांतने एक सुपरहिट चित्रपट दिला जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरला तो म्हणजे एमएस धोनी. या चित्रपटातील धोनीच्या भूमिकेत सुशांतला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मृत्यूपूर्वी सुशांतने ‘दिल बेचारा’ या आणखी एका चित्रपटात काम केले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Kriti sanon, Sushant sing rajput

    पुढील बातम्या