मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

5 Years Of Raabta: सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत इमोशनल झाली क्रिती सेनन, म्हणाली...

5 Years Of Raabta: सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत इमोशनल झाली क्रिती सेनन, म्हणाली...

5 Years Of Raabta: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला   (Sushant Singh Rajput) जाऊन तब्बल दोन वर्षे होत आली आहेत. परंतु आजही त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याच्या आठवणीत रमत असतात.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 10 जून-   अभिनेता सुशांत सिंह राजपूतला   (Sushant Singh Rajput) जाऊन तब्बल दोन वर्षे होत आली आहेत. परंतु आजही त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याच्या आठवणीत रमत असतात. असंच काहीसं अभिनेत्री क्रिती सेननसोबतसुद्धा   (Kriti Sanon)  झालं आहे. नुकतंच सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन स्टारर 'राबता' (Raabta)  या चित्रपटाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिनेश विजान दिग्दर्शित हा चित्रपट 9 जून 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाशी अभिनेत्रीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. दुःखद बाब म्हणजे जून महिन्यातच, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं होतं. या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना सुशांत आणि क्रिती डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या दोघांनी कधीही या गोष्टीचा अधिकृत खुलासा केलेला नव्हता. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने या चित्रपटासोबत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती सेननने इन्स्टाग्रामवर एक गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिग्दर्शक अमर कौशिक यांनी शूट केला आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ क्रिती आणि वरुण धवनच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या सेटवरील असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या व्हिडिओमध्ये क्रिती 'राबता' या चित्रपटाचा टायटल ट्रॅक गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हे वाचा: Samantha Instagram: समंथा प्रभू एका इन्स्टाग्राम पोस्टमधून मिळवते तब्बल इतके कोटी, जाणून व्हाल थक्क) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक दिनेश विजान यांच्यासाठी क्रिती सेननने एक इमोशनल पोस्ट लिहून 'राबता'च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. क्रितीने पोस्टमध्ये लिहिलंय, ''‘मेहरबानी जाते जाते मुझपे कर गया, गुजरता सा लम्हा एक दामन में भर गया'' ही ओळ अनेक अर्थाने खास होती...आठवणींनी भरलेला चित्रपट..माझ्या हृदयाच्या जवळचा प्रवास..आणि तुम्हा दोघांसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे: सुशांत आणि दिनू. राबताची 5 वर्षे''.अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Kriti sanon, Sushant sing rajput

पुढील बातम्या