मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Celebes Education:क्रिती सेननला 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Celebes Education:क्रिती सेननला 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 सप्टेंबर-    बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. आज ती टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु फक्त अभिनयच नव्हे तर क्रिती आपल्या शैक्षणिक वर्षातसुद्धा प्रचंड हुशार विद्यार्थिनी होती. फारच कमी लोकांना क्रितीच्या शिक्षणाबाबत माहिती आहे. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

क्रिती सेननचा जन्म 27 जुलै 1990 मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. क्रिती एका आर्थिकदृष्ट्या चांगल्या कुटुंबात जन्मली आहे. तिच्या वडिलांचं नाव राहुल सेनन असं आहे. ते एक चार्टर्ड अकौंटंट आहेत. तर तिच्या आईचं नाव गीता सेनन असं असून त्या दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीसुद्धा आपल्या शालेय वयात फारच हुशार आणि गुणी विद्यार्थिनी होती. क्रितीला एक बहीणसुद्धा आहे. तिचं नाव नुपूर सेनन आहे. तीसुद्धा एक अभिनेत्री आहे.

क्रिती सेनने दिल्ली पब्लिक स्कुल आणि आर के पुरम स्कुलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तिला बालपणापासून अभ्यासात रुची होती. तिने कधीही अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यामुळेच क्रितीने इंजिनीरिंगचं शिक्षण घेतलं आहे. वाटलं ना आश्चर्य? हे खरं आहे. क्रिती सेनन एक इंजिनियर आहे. तिने नोएडाच्या जेपी इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशनची डिग्री घेतली आहे. इंजिनियरिंग करत असताना अभिनेत्रीला मॉडेलिंगच्या ऑफर मिळत होत्या. त्यानंतर तिने जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आणि यातूनच नकळत ती सिनेसृष्टीत आली. क्रितीने सुरुवातीला तामिळ चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात डेब्यू केला होता. त्यानंतर टायगर श्रॉफ सोबत 'हिरोपंती' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.

(हे वाचा:दिवसातून फक्त एकदा जेवण, उच्चशिक्षणासाठी नव्हता पैसा; समंथा प्रभूचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय VIRAL )

क्रिती सेनने 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी' 'हाऊसफुल 4' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तिच्या 'मिमी' या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं. लवकरच ती अभिनेता प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात झळकणार आहे. क्रितीजवळ सध्या अनेक चित्रपट आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Digital prime time, Entertainment, Kriti sanon