मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bharat Jadhav and Kranti Redkar : तब्बल 16 वर्षांनी कोंबडी पळालीच्या तालावर भरत आणि क्रांतीने पुन्हा धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Bharat Jadhav and Kranti Redkar : तब्बल 16 वर्षांनी कोंबडी पळालीच्या तालावर भरत आणि क्रांतीने पुन्हा धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Bharat jadhav and kranti redkar

Bharat jadhav and kranti redkar

बस बाई बस या कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध महिला सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागाची प्रचंड चर्चा होते. येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक धमाल सरप्राईज मिळणार आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 18 ऑगस्ट : झी मराठीवर नवीन सुरू झालेल्या  'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच प्रचंड चर्चा आहे. हा कार्यक्रम खास महिलांसाठीच आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला नवीन स्त्री सेलिब्रिटी सहभागी होत असतात. त्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्याची धमाकेदार उत्तर मिळतात. त्यांची प्रचंड चर्चा होते. मागच्या भागात प्रसिद्ध राजकारणी पंकजा मुंडे यांनी धमाल उडवून दिली होती. आता या भागात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सहभागी होणार आहे. पण या मंचावर अजून  एक सरप्राईज प्रेक्षकांना मिळणार आहे. आतापर्यंत 'बस बाई बस' मध्ये फक्त महिला सेलिब्रिटींचे सहभागी झाल्या होत्या. पण या भागात चाहत्यांना त्यांच्या लाडक्या नायकाला पाहण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागात महाराष्ट्राचा लाडका भरत जाधव हजेरी लावणार आहे. आता क्रांती आणि भरत एकत्र येणार म्हंटल्यावर धमाल तर होणारच. या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये भरत आणि क्रांती त्यांच्या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहेत.
भरत  जाधव आणि क्रांती रेडकरच्या जोडीने 'जत्रा' चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही  जोडी आता एवढ्या वर्षांनंतर पुन्हा  येणार आहे. या चित्रपटातील 'कोंबडी पळाली' या गाण्यावर अक्खा महाराष्ट्र थिरकला होता. सगळ्यांनी या गाण्याला डोक्यावर घेतले होते. आता बस बाई बस मध्ये हे दोघे कोंबडी पळाली या गाण्यावर एकत्र थिरकताना महाराष्ट्रातील  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - Spruha joshi : स्पृहाने घेतलयं स्वतःला बदलण्याचं चॅलेंज; चाहत्यांकडून होतंय कौतुक क्रांती रेडकर तिच्या बिंधास्तपणासाठी ओळखाली जाते. ती सोशल मीडियावर धमाल व्हिडीओ अपलोड करत असते त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.  आता बस बाई बसच्या या मंचावर क्रांतीने धमाल उडवून टाकली आहे. बस बाई बस या कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध महिला सहभागी होत आहेत. एवढंच नाही तर इतर महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना भाग आहे.  अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. गप्पा आणि मुलाखत अशा वेगळ्या धाटणीचा हा कार्यक्रम आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या