मुंबई, 28 जानेवारी : वादग्रस्त वेब सीरिज (web series) तांडवसमोरील (Tandav) अडचणी आता अधिकच वाढत चालल्या आहेत. समाजाकडून, राजकीय क्षेत्रातून या वेब सीरिजला विरोध असताना आता सिनेक्षेत्रातूनही तांडव विरोधी सूर उमटू लागले आहेत. तांडवशी संंबधित सर्वांना अटक करा, अशी मागणी एका अभिनेत्रीनं केली आहे. अभिनेत्रीनं अटकेची मागणी करणारं ट्विट केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
तांडवविरोधात कित्येक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. याबाबत तांडवच्या मेकर्सनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात याचिकाही फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे तांडवप्रकरणी ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत त्यांची अटक अटळ आहे. असं असताना आता अभिनेत्रीनं कोंकणा सेन शर्मानं (Konkona Sen sharma) देखील अटकेची मागणी केली आहे.
Almost all involved in the show have read the script and signed the contract! Let’s arrest the whole cast and crew? https://t.co/xbqbQ641D7
कोंकणानं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये तिनं म्हटलं, "जितके लोक शोमध्ये असतात ते सर्व स्क्रिप्ट वाचतात आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट साइन करतात. मग सर्व कास्ट आणि क्रूना अटक का होऊ नये?"
तांडवविरोधात सहा राज्यांमध्ये 7 FIR दाखल आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत अनेकांविरोधात ही एफआयआर आहे. या सर्व एफआयर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. तसंच सुरक्षा पुरवण्याचीही मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं अभिनेता मोबम्मद झिशान अय्युब, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि तांडवच्या मेकर्सना अटकेपासून सुरक्षा देण्याचं नाकारलं आहे. तसंच अटकपूर्व जामिनासाठी आणि एफआयर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.
तांडवच्या वेब सीरीज पहिल्या एपिसोडमध्ये 17व्या मिनिटाला दाखवण्यात आलेल्या हिंदू देवी-देवतांना अमर्याद पद्धतीने दाखवून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच महिलांचा अपमान केल्याने वेब सीरीजचा हेतू एका समुदायाच्या धार्मिक भावना भडकवल्याचंही म्हटलं आहे. या सीरीजचा व्यापक प्रसार समाजासाठी हानिकारक असल्याचं म्हणत वेब सीरीजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.