मुंबई, 03 डिसेंबर : राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन शर्मा. अभिनेत्री आज तिचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. कोंकणा तिच्या अभिनयामुळे कायम चर्चेत राहिली. अनेक पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आलं. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली. आयुष्यात अनेक अडथळे पार करत ती काम करत राहिली आणि आज एका मुलाचा व्यवस्थित सांभाळही करत आहे. तिची प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्याविषयी खास गोष्टी आणि तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया.
कोंकणाचे वडील प्रसिद्ध पत्रकार मुकुल शर्मा तर आई दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अपर्णा सेन. कोंकणानं आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 1983मध्ये आलेल्या इंदिया या बंगाली सिनेमात तिनं काम केलं. त्यानंतर 2002मध्ये आलेल्या तितली या सिनेमातून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
हेही वाचा - अनेक वर्षांनंतर समोरासमोर आले शाहरुख आणि प्रियांका; चाहत्यांना आठवला 'तो' किस्सा
त्यानंतर आजा नच ले च्या सेटवर तिची ओळख अभिनेता रणवीर शौरीबरोबर झाली. 2007मध्ये दोघांमध्ये प्रेम झालं आणि ते एकमेकांना डेट करू लागले. दोघांनी 3 सप्टेंबर 2010ला घाईघाईमध्ये लग्न केलं आणि 15 मार्च 2011ला कोंकणाला मुलगा झाला. लग्नाआधीच कोंकणा प्रेग्नंट होती असं म्हटलं जातं. मुलाच्या जन्मानंतर दोघांमधील नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2015 त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2020मध्ये 5 वर्षांनी दोघांना घटस्फोट मिळाला. मुलाची कस्टडी कोंकणाकडे देण्यात आली. ती मुलाला एकटी वाढवत आहे.
View this post on Instagram
कोंकणाला आजवर अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. पेज 3 फिल्मनं तिला नवी ओळख मिळाली. कोंकणानं अनेक सिनेमात निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. कोंकणाला तिच्या उत्तम अभिनयासाठी 2006 आणि 2007मध्ये सलग दोन वर्ष सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ओंकारा आणि लाइफ इन ए मेट्रो या दोन सिनेमांसाठी कोंकणाला हे पुरस्कार मिळाले होते. ओंकारा सिनेमातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडते. मिस्टर एन्ड मिसेस अय्यरमधील मीनाक्षी अय्यर देखील तिनं उत्तम साकारली होती. तसंच पेज 3मधील माधवी शर्मा, लिपस्टिक अंडर माय बुर्खामधील शिरीन असलम, अजीब दास्तानमधील भारती मंडल या कोंकणाच्या काही गाजलेल्या भूमिका आहेत.
सेलिब्रेटी नेटवर्थ डॉटकॉमनं दिलेल्या माहितीनुसार, कोंकणा सेन शर्मा 5 मिलियन संपत्तीची मालकीण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News