मुंबई 2 जुलै: सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती (Kon Honar Crorepati) हा शो बराच प्रसिद्ध होताना दिसत आहे. या कार्यक्रमात ज्ञान आणि मनोरंजन यांची परफेक्ट सांगड घातलेली पाहायला मिळते. सचिन खेडेकर यांच्या विशेष अंदाजाने हॉट सीटवर बसलेल्या स्पधकाला सुद्धा खेळ खेळताना मजा येते. या कार्यक्रमातील कर्मवीर या स्पेशल सेगमेंट मध्ये आज अधिक कदम हे पाहुणे दिसणार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर बरंच काही ते बोलताना दिसत आहेत.
महाराजांचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं महान व्यक्तिमत्त्व ते आहेत याबद्दल दुमत नाहीच. अधिक कदम यांनी महाराजांचं बाळकडू सगळ्यांनी घेतलं पाहिजे अशी आशा या कार्यक्रमात व्यक्त केली आहे. आजच्या भागात त्यांचा हा संवाद दाखवला जाणार आहे. या संवादाचा एक विडिओ सोनी मराठीच्या सोशल मीडिया ओएजवर शेअर करण्यात आला आहे.
सचिन खेडेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटात महाराजांचे अनेक आदर्श रसिकांपर्यंत पोहोचवले होते. महाराजांचा मावळा कधीच कोणापेक्षा कमी नाहीये, आसपासच्या प्रत्येक गोष्टीतला अन्याय दूर करायचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे अशा अनेक खाजगी आणि सामाजिक आयुष्यातील प्रसंगातून महाराजांचा आदर्श कसा अंगी बाणवावा हे हा चित्रपट सांगतो. याच धर्तीवर अधिक कदम असं सांगतात, “आपल्या राजाने समाजातील स्त्रीला सन्मानाची वागणूक द्यावी हे नुसतं सांगितलं नाही तर हे संस्कार घालून दिले आहेत. महाराजांना जेव्हा एका सरदाराने स्त्री भेटवस्तू म्हणून दिली होती तेव्हा त्याला महाराजांनी जी शिक्षा द्यायची ती दिलीच पण महत्त्वाचं म्हणजे त्या स्त्रीला चोळी बांगडी देऊन, तिची अब्रू राखत तिला सन्मानाने परत पाठवलं. महाराजांनी हा नियम आपल्या मराठी संस्कृतीत घालून दिला आहे. हेच संस्कार मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाने महाराजांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे आणि त्यावर चाललं पाहिजे.”
View this post on Instagram
महाराजांचे मावळे म्हणवून घेणं हे अभिमानापेक्षा मोठ्या जाबदारीचं काम आहे असं या संवादातून समजतं. त्यांच्या या बोलण्याने नक्कीच आजच्या पिढीवर काही चांगले संस्कार होतील एवढं नक्की.
हे ही वाचा- 'लहानपणीचे कपडे ते साडी उधार घेण्यापर्यंत...', दिग्दर्शकाच्या लेकीनं हर्षदासाठी लिहिली खास बर्थ डे पोस्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati shivaji maharaj, Marathi entertainment, Tv serial