मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC 14: स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा, अमिताभ बच्चनही झाले आश्चर्यचकित

KBC 14: स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा, अमिताभ बच्चनही झाले आश्चर्यचकित

स्वांतंत्र्यदिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'कौन बनेगा करोडपती' च्या एपिसोडमध्ये स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा झाल्याचं दिसून आलं. यावेळी अमिताभ बच्चन यांनीही आश्चर्य व्यक्त केल्याचं दिसून आलं.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 16 ऑगस्ट: सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (Kon Banega Karodpati 14)भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे 13 सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून सध्या 14 वा सीझन चांगलाच गाजत आहे. यावेळीही 'कौन बनेगा करोडपती 14' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळीही बिग बी अमिताभ बच्चनच सांभाळत आहेत. स्वांतंत्र्यदिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा झाल्याचं दिसून आलं. यावेळी अमिताभ बच्चन यांनीही आश्चर्य व्यक्त केल्याचं दिसून आलं. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने यावेळी 75 लाखांच्या प्रश्नाचा नवा टप्पा शोमध्ये जोडला गेला होता. या एपिसोडमध्ये दिल्लीतील 27 वर्षीय आयुष गर्ग सहभागी झाला होता. या एपिसोडमध्ये आयुषपेक्षा त्याची गर्लफ्रेंड आरुषी शर्माचीच जास्त चर्चा झाल्याची पहायला मिळालं. या एपिसोडचा प्रोमो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यामध्ये अमिताभ बच्चन आयुषला विचारतात की तो कोणासोबत शोमध्ये आला आहे. यावर आयुष सांगतो की तो त्याच्या मैत्रिणीसोबत शोमध्ये आला आहे. आयुषचे उत्तर ऐकून बिग बींनी खिल्ली उडवली की आजपर्यंत या शोमध्ये प्रत्येकजण आपापल्या मित्रांसोबत किंवा पालकांसोबत आला आहे, पहिल्यांदाच कोणीतरी गर्लफ्रेंडसोबत इथे आला आहे.
आयुषच्या गर्लफ्रेंडनं यावेळी अमिताभ बच्चन यांची उत्सुकता वाढवलेली पहायला मिळाली. अमिताभ आयुषला त्यांच्या प्रेमाविषयी विचारतात, तुम्ही कसे भेटले?. यावर आयुष म्हणतो ते ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे एकमेकांना भेटले. हे ऐकून अमिताभ बच्चन यांची उत्सुकता आणखीनच वाढली आणि त्यांनी ऑनलाइन डेटिंग नक्की काय असतं विचारलं. पुढे ते म्हणाले की मी हे स्वतःसाठी विचारत नाहीये. हे ऐकून एकच हशा पिकला. हेही वाचा -  Gautami Deshpande: 'काहीतरी नवीन ट्राय करुया'; गौतमी देशपांडेची नवी पोस्ट चर्चेत दरम्यान, 'कौन बनेगा करोडपती' मागच्या सीझनमध्ये बक्षीस रक्कम 7 कोटी होती. या नव्या सीझनमध्ये या रकमेतही वाढ झालीआहे. या वर्षी ती 7.5 कोटी रुपये आहे. शेवटच्या 7.5 कोटी प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसलेल्यांना 75 लाख रुपये घरी घेऊन जाता येणार आहे.
First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Social media, Viral

पुढील बातम्या