मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मनोरंजनसृष्टी हादरली! 15 दिवसात चार आत्महत्या, 18 वर्षीय मॉडेलनं गळफास घेऊन संपवलं आयुष्य

मनोरंजनसृष्टी हादरली! 15 दिवसात चार आत्महत्या, 18 वर्षीय मॉडेलनं गळफास घेऊन संपवलं आयुष्य

तीन अभिनेत्रींच्या निधनानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे बंगाली अभिनेत्रींच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं आहे. आता एका 18 वर्षीय मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना उघडकीय आली आली आहे.

 मुंबई, 30 मे-Kolkata Model Saraswati Das Suicide : मनोरंजन सृष्टीत धक्कादायक प्रकार घडत आहे. अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्र सुरुच आहे. पल्लवी डे (Pallavi De) बिदीशा डे मुजुमदार (Bidisha De Mujumdar) व अभिनेत्री मंजूषा नियोगीच्या (Manjusha Neogi) निधनानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे बंगाली अभिनेत्रींच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं आहे. आता एका 18 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीय आली आली आहे. मॉडेलचे नाव सरस्वती दास ( Saraswati Das Suicide ) असल्याचे सांगण्यात येत आहे. कोलकत्ता येथील कसबा भागात ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सरस्वतीने घरात तिच्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री 2 वाजता सरस्वतीच्या आजीने तिला अशा अवस्थेत पाहिलं आणि तत्काळ तिला खाली उतरवून सरकारी दवाखान्यात नेलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तिच्या आजीसोबत झोपली होती, रात्री 2 वाजता सरस्वती दिसली नाही, तेव्हा त्या त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेल्या. जिथे त्यांना सरस्वती पंख्याला लटकलेली दिसली.

वाचा-श्रद्धा कपूरचा व्हाईट मिनी ड्रेसमध्ये जबरदस्त स्टायलिश अंदाज, चाहत्यांकडून पसंती

यापूर्वी 15 मे रोजी बंगाली टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी डे आपल्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदारचा आपल्या घरी मृतदेह आढळला होता. त्यांनतर 27 मे रोजी अभिनेत्री  मंजूषा  नियोगीचा मृतदेह तिच्या कोलकत्ता येथील राहत्या घरी आढळून आला होता. आता यानंतर आणखी एका 18 वर्षाच्या मॉडेलनं आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं बंगाली मनोरंजनसृष्टी हादरली आहे.

First published:

Tags: Actress, Entertainment, Kolkata, Suicide