कोल्हापूर चित्रनगरीत पुन्हा घुमणार 'लाईट, कॅमेरा अँड अॅक्शन...'

कोल्हापूर चित्रनगरीत पुन्हा घुमणार 'लाईट, कॅमेरा अँड अॅक्शन...'

कोल्हापूरमधल्या चित्रनगरीला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

07 एप्रिल : मराठी चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली ती कलानगरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये...पण याच कोल्हापूरमधल्या चित्रनगरीला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे.

गेल्या 2 दशकांमध्ये कोल्हापूरमध्ये चित्रपटांचं शुटिंग होण्याचं प्रमाण कमी झालं होतं. त्यातच जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोनसह कोल्हापूरची चित्रनगरीही चित्रीकरणासाठी योग्य नसल्यानं निर्मात्यांसह दिग्दर्शकांनीही कोल्हापूरकडे पाठ फिरवली होती. पण आता येत्या जूनपासून कोल्हापूरच्या या चित्रनगरीमध्ये लाईट, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज घुमणार आहे.

नुकताच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी या चित्रनगरीच्या कामाची पाहणी केली. राज्य सरकारकडून चित्रनगरीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यातील निधीही मंजूर करण्यात आलाय.

त्यामुळे सध्या चित्रनगरीतलं हे काम वेगानं सुरू आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यासह कोल्हापूरमधल्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनीही यावेळी चित्रनगरीला भेट दिली. या निमित्तानं कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आता मराठीसह हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण होवून स्थानिक कलाकार आणि कामगारांसाठी ही महत्वाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलंय.

First published: April 7, 2017, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading