Koffee with Karan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, करण जोहरने केली धक्कादायक घोषणा
Koffee with Karan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, करण जोहरने केली धक्कादायक घोषणा
कॉफी विथ करण (Koffee with Karan) नवीन सीझनसह परत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि होस्ट करण जोहरने सोशल मीडियावर जाहीर केले की त्याचा टॉक शो परत येणार नाही.
मुंबई, 04 मे: कॉफी विथ करण (Koffee with Karan) नवीन सीझनसह परत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि होस्ट करण जोहरने सोशल मीडियावर (Karan Johar revealed that Koffee With Karan is never returning back with new season) जाहीर केले की त्याचा टॉक शो परत येणार नाही. बुधवारी सकाळी त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसह आणि फॉलोअर्ससह एक नोट शेअर केली आहे. 'जड अंतःकरणाने' त्याने हे जाहीर करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'हॅलो, कॉफी विथ करण हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, आतापर्यंत 6 सीझन झाले. मला असे वाटते की आम्ही प्रभाव पाडला आहे आणि पॉप संस्कृतीच्या इतिहासात आमचे स्थान देखील सापडले आहे. आणि म्हणूनच मी जड अंतःकरणाने जाहीर करतो की 'कॉफी विथ करण' परत येणार नाही.'
शोचे अनेक चाहते या नवीन सीझनची वाट पाहत होते, त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी हे खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, 'NOOOOO कृपया हे सांगू नका हे द्वेष करणाऱ्यामुळे आहे', आणखी एकाने 'End of an Era' (एक युगाचा अंत) अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी भविष्यात कधीतरी कॉफी विथ करनचा नवा सीझन पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.