News18 Lokmat

वरुण धवननं करण जोहरजवळ दिली 'या' गोष्टीची कबुली

करण जोहर कोणाच्या मनातून काहीही काढून घेत असतो. वरुण धवनशीही त्याची मनमोकळी बातचीत झाली.

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 04:18 PM IST

वरुण धवननं करण जोहरजवळ दिली 'या' गोष्टीची कबुली

मुंबई, 12 नोव्हेंबर : काॅफी विथ करण 6 या शोची बरीच चर्चा सुरू आहे. एकाहून एक सरस कलाकार या शोमध्ये येतायत. यावेळच्या शोमध्ये वरुण धवननं असं काही सांगितलंय की सगळे हैराण झाले.


करण जोहर कोणाच्या मनातून काहीही काढून घेत असतो. वरुण धवनशीही त्याची मनमोकळी बातचीत झाली. वरुण आणि नताशा अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. त्याबद्दल वरुणनं सांगितलं की नताशा त्याची गर्लफ्रेंड आहे. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि लवकरच ते लग्न करणार आहेत.


वरुण धवनच्या कुटुंबातही नताशा प्रिय आहे. तिचं नेहमी येणं-जाणं असतं. वरुणच्या घरच्या अनेक कार्यक्रमांना ती उपस्थित राहते.

Loading...


वरूण धवन हा बाॅलिवूडचा एक चांगला अभिनेता. स्टुडंट आॅफ द इयर,बदलापूर,आॅक्टोबर असे सिनेमे त्यानं गाजवले. त्याची कधीच कोणाशी लिंक जोडली गेली नव्हती. म्हणूनच सगळ्यांना प्रश्न पडला होता त्याची गर्लफ्रेंड कोण?


वरूण धवन गेली 10 वर्ष डेट करतोय. त्याच्या आयुष्यात गेली 10 वर्ष एकच व्यक्ती आहे. फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत वरूणचं म्हणणं आहे, नताशा माझ्यावर अभिनेता म्हणून प्रेम करत नाही. आमच्यातले बंध मजबूत आहेत.


वरूण आणि नताशा लग्न करणार आहेत. पण त्याला थोडा वेळ आहे. वरुण म्हणाला, माझं पहिलं प्रेम सिनेमा आहे. पण लवकरच तुम्हाला लग्नाबद्दल कळेल.


वरुणनं बदलापूर, आॅक्टोबर हे सिनेमे नताशाच्या सांगण्यावरून केले होते. वरुणचा नुकताच सुईधागा सिनेमा रिलीज झाला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.


राखी सावंतला विदेशी कुस्तीपटूने उचलून आपटलं, रुग्णायलात दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...