Koffeewithkaran : अजय देवगण विसरला लग्नाची तारीख, काजोलनं काय दिली प्रतिक्रिया?

Koffeewithkaran : अजय देवगण विसरला लग्नाची तारीख, काजोलनं काय दिली प्रतिक्रिया?

कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये यावेळी अजय देवगण आणि काजोल येणार आहेत. यावेळी करण जोहरच्या प्रश्नांना उत्तर देताना अजय देवगण गडबडल्यानं काजोल नाराज झाली आहे. अभिनयात आपली हुशारी दाखवणारा अजय देवगण पत्नीसमोर हुशारी दाखवतो का पाहा.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये यावेळेस तरुण कलाकारांनी हजेरी लावली होती. तरुणांसोबतच आत्तापर्यंत आमिर खान आणि सेफ अली खानसारखे कलाकारही आले होते. अनेक कलाकारांनी एकमेकांविषयी बरेच सिक्रेट सांगितले. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये नव्यानं एंट्री करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खानलादेखील या शोमध्ये येण्याची संधी मिळाली.

90च्या काळात ज्या अभिनेत्रीच्या नावानं थिएटरमध्ये गर्दी व्हायची ती करण जोहरची लाडकी अभिनेत्री काजोल देवगण या शोमध्ये येणार आहे. करणने काजोलला आमंत्रण दिल्यावर तिने अजयसोबत येणं पसंत केलं आहे. यानिमित्तानं इतक्या वर्षांपासूनचे त्यांचे नाते पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये काजोल-अजयला काही प्रश्न विचारली गेली यावर त्यांची गमतीशीर उत्तरं ऐकायला मिळाली.

अजय देवगण प्रत्येक मुलाखतीत फार हुशारीने उत्तरं देतो. पण यावेळी तो करणच्या प्रश्नांना उत्तर देताना गडबडला आहे. अजय देवगणला जेव्हा लग्नाच्या तारखेबाबत प्रश्न विचारला तेव्हा अजयनं दिलेलं उत्तर काजोलला अपेक्षित नव्हतं. यावरुन काजोल थोडी नाराज झाली आहे. यानंतर तिला बोलायची इच्छाच उरली नाही. पण तरीही फक्त करणच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काजोलनं लग्नाची तारीख सांगण्याचा पुढाकार घेतला.

 

 

View this post on Instagram

 

Real life antics trump reel life drama when you're @ajaydevgn and @kajol! #KoffeeWithKaran #KoffeeWithAjay #KoffeeWithKajol

A post shared by Star World (@starworldindia) on

या व्हिडिओमध्ये अजयनं सांगितलं की, काजोलला फोटो काढायला आणि दुसऱ्याकडून काढून घ्यायला फार आवडतं. फोटो काढणं वाईट नाही आहे. पण त्या फोटोला एडीट करण्यासाठी वेळ वाया घालवणं वाईट आहे. यानंतर अजय असं देखील म्हणाला की हे सगळं बहुतेक म्हातारपणामुळे असं होतं असावं. यावर काजोलची पुन्हा संताप देणारी प्रतिक्रिया होती.

#MUMBAI 26/11 : थरकाप उडवणाऱ्या अनुभवाबद्दल सांगतेय सोनाली खरे

First published: November 26, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading