मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तू कियाराबरोबर लग्न करणार का? Koffee With Karan मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा करणार मोठी घोषणा

तू कियाराबरोबर लग्न करणार का? Koffee With Karan मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा करणार मोठी घोषणा

सोनम आणि अर्जुन कपूरनंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणार आहेत. या भागात सिद्धार्थ त्याच्या आणि कियाराच्या नात्याविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

सोनम आणि अर्जुन कपूरनंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणार आहेत. या भागात सिद्धार्थ त्याच्या आणि कियाराच्या नात्याविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

सोनम आणि अर्जुन कपूरनंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणार आहेत. या भागात सिद्धार्थ त्याच्या आणि कियाराच्या नात्याविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 16 ऑगस्ट: करण जोहरच्या कॉफी विथ करणचा दर आठवड्याचा भाग फारचं इंट्रेस्टिंग असतो. मागील आठवड्यात अभिनेत्री सोनम कपूरनं अर्जुन कपूरची चांगलीच पोलखोल केलेली पाहायला मिळाली. या आठवड्यात बॉलिवूडचे पंजाबी बॉय सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल सहभागी होणार आहेत. करण विक्कीची कतरिनावरुन चांगलीच शाळा घेणार आहे तर सिद्धार्थला देखील त्याच्या लग्नाविषयी भन्नाट प्रश्न विचारणार आहे. कॉफी विथ करणचा या आठवड्यातील प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात सिद्धार्थ त्याच्या लग्नाविषयी मोठा खुलासा करणार आहे असं दिसून येत आहे. कॉफी विथ करणमध्ये विक्की आणि सिद्धार्थला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारले गेले.  प्रोमोच्या सुरुवातीलाच करण विक्कीला चिडवताना दिसतोय. कॉफी काउचचा मंच विक्कीसाठी खूप खास आहे. इथे सांगितलेल्या गोष्टी पुढे जाऊन खऱ्या होता. कारण कॉफी विथ करणमध्येच कतरिनानं माझी जोडी विक्की कौशलबरोबर छान वाटेल असं म्हटलं होतं आणि काही महिन्याच दोघे रिलेशनशिपमध्ये आले आणि आता त्यांनी लग्न केलं. असं बोलून झाल्यानंतर करणनं त्याचा मोर्चा सिद्धार्थकडे वळवला. हेही वाचा - Bipasha Basu Pregnancy: बिपाशा बसूने प्रेग्नन्सी न्यूज केली कन्फर्म! पहिल्यांदाच शेअर केले बेबी बम्पचे फोटो
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या कथिक गर्लफ्रेंड कियारा अडवाणीमुळे चांगलात चर्चेत आहे. दोघांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. यावरुनच कॉफी विथ करणच्या मंचावर करणनं सिद्धार्थची चांगलीच फिरकी घेतली. करण थेट सिद्धार्थला 'तू कियाराबरोबर लग्न करणार का?' असा प्रश्न विचारला. त्यावर सिद्धार्थ चक्क लाजताना दिसत आहे.  सिद्धार्थच्या लाजवण्यावर करण त्याला म्हणतो, काउचवर बसलेल्या ज्या ज्या लोकांनी त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली आहे ती पुढे जाऊन पूर्ण झाली आहे. त्यामुळे तुझा कियाराबरोबर लग्नाचा काही प्लान आहे  का? असा थेट प्रश्न सिद्धार्थला विचारला. करणच्या या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणाला, ठिक आहे मी हॅप्पी आणि ब्राइट फ्यूचरची घोषणा करेन. त्यामुळे आता  कॉफी विथ करणच्या या आठवड्याच्या भागात सिद्धार्थ त्याच्या लग्नाची घोषणा करणार का ? असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडला आहे.  त्यामुळे या आठवड्यातील एपिसोड पाहणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे. त्याचप्रमाणे या एपिसोडमध्ये विक्की कौशल त्याच्या आणि कतरिनाची लव्ह स्टोरी देखील सांगण्याची शक्यता आहे. करण नेहमीप्रमाणे विक्की आणि सिद्धार्थला बोलतं करताना प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे विक्की आणि सिद्धार्थ ही पंजाबी पोर त्यांच्या स्टाइलनं एपिसोडची मज्जा देखील वाढवणार आहेत.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News

पुढील बातम्या