‘तू कुठून आलीस हे विसरू नकोस...’ करिनाने दिला प्रियांका चोप्राला सल्ला

‘तू कुठून आलीस हे विसरू नकोस...’ करिनाने दिला प्रियांका चोप्राला सल्ला

या दोन्ही अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टी एकसारख्या मिळाल्या. यातलीच एक वेगळी गोष्ट म्हणजे सैफ अली खानने करिनाला आणि निकने प्रियांकाला ग्रीसमध्ये प्रपोज केलं.

  • Share this:

मुंबई, १९ फेब्रुवारी २०१९- priyanka chopra and kareena kapoor in koffee with karan season 6 करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोचा पुढचा भाग फार खास असणार आहे. हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्या विवादानंतर आता पुन्हा एकदा अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पॉप सिंगर निक जोनसशी लग्न झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारी प्रियांका कपूर आणि तैमुरमुळे चर्चेत असलेली करिना कपूर खान एकत्र दिसणार आहेत.

करिना आणि प्रियांकाने अक्षय कुमारच्या एतराज सिनेमात एकत्र काम केलं होतं. तसंच शाहरुख खानच्या डॉन सिनेमातही दोघी एकत्र दिसल्या होत्या. आता या दोघी पुन्हा करण जोहरच्या चॅट शोमध्ये एकत्र आल्या असून, यावेळी त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे.

निकशी लग्न झाल्यानंतर प्रियांका अमेरिकेतच राहायला लागली. यामुळे ती बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्येच जास्त सक्रीय आहे. यावेळी करणने बॉलिवूड अभिनेत्यांच्या अफेअरबद्दल प्रियांकाशी चर्चा केली. यावर प्रियांका म्हणाली की, ‘मला कोणत्या अभिनेत्याचं कोणाशी अफेअर आहे हे माहीत नाही.’ यावर करिना म्हणाली की, ‘तू असं कसं बोलू शकतेस. आता तुला फक्त हॉलिवूडमधल्या लोकांबद्दलच माहीत आहे का? तू तुझे मूळ विसरू नकोस.’

त्याचे झाले असे की, वरूण धवनच्या अफेअरची कॉफी विथ करणमध्ये चर्चा होत होती. यावेळी बॉलिवूडमधील गॉसिपमधून प्रियांका बाहरे जात असल्याचं तिने सांगितलं. यावर करिना तिला बोलली की तू तुझं मूळ विसरू नकोस.. तू कुठून आली आहे याचा विसर पडायला देऊ नकोस.

या दोन्ही अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टी एकसारख्या मिळाल्या. यातलीच एक वेगळी गोष्ट म्हणजे सैफ अली खानने करिनाला आणि निकने प्रियांकाला ग्रीसमध्ये प्रपोज केलं. या आठवड्यात रविवारी हा एपिसोड स्टार नेटवर्क आणि हॉट स्टारवर दाखवण्यात येणार आहे.

VIDEO : शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्यासाठी आई-वडिलांनी दागिने ठेवले गहाण

First published: February 19, 2019, 12:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading