Home /News /entertainment /

Koffee Shots With Karan: सारा अली खानला बॅचलर नव्हे तर या लग्न झालेल्या अभिनेत्यांना पाहायचंय आपल्या स्वयंवरात

Koffee Shots With Karan: सारा अली खानला बॅचलर नव्हे तर या लग्न झालेल्या अभिनेत्यांना पाहायचंय आपल्या स्वयंवरात

धनुष आणि सारा अली खान त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या 'कॉफी शॉट्स विथ करण' (Kofee Shots With Karan) शोमध्ये पोहोचले आहेत.

  मुंबई,21  डिसेंबर-  सारा अली खान   (Sara Ali Khan), अक्षय कुमार   (Akshay Kumar)  आणि धनुष   (Dhanush)  यांचा 'अतरंगी रे'  (Atarangi re)  हा चित्रपट येत्या 24 डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत सारा आणि धनुष चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. धनुष आणि सारा अली खान आता त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या 'कॉफी शॉट्स विथ करण'  (Kofee Shots With Karan)  शोमध्ये पोहोचले आहेत. करण जोहरच्या चॅट शोमध्ये दोन्ही कलाकारांनी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंग, बिहाइंड द सीन्स सारख्या अनेक विषयांवर चर्चा केली. यादरम्यान सारा तिच्या स्वयंवरावरही बोलताना दिसली. कॉफी शॉट्स विथ करणचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या प्रोमोची सुरुवात करण जोहरपासून होते.तो धनुषला शोमध्ये 'पॉवरहाऊस परफॉर्मर' म्हणून आणि सारा अली खानला 'सुंदर आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री' म्हणत त्यांचं शोमध्ये स्वागत करतो. यानंतर करण दोघांशी गप्पा मारायला सुरू करतो. दरम्यान, धनुष करणला आपल्या कमी बोलण्याच्या सवयीबद्दल सांगतो आणि म्हणतो की मी तुझ्या शोमध्ये काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करेन. यानंतर, करण धनुषला विचारतो की तो रजनीकांतच्या रूपात एका सकाळी उठला तर तो काय करेल. याला उत्तर देत धनुष म्हणतो की, मला नेहमीच रजनीकांत व्हायला आवडेल.
  यानंतर करणनं सारा अली खानला विचारलं की तिला तिच्या स्वयंवरमध्ये कोणते चार कलाकार बघायचे आहेत. याला उत्तर देत सारा अली खानने रणवीर सिंह, विजय देवरकोंडा, विकी कौशल आणि वरुण धवन यांची नावे घेतली आहेत. हे ऐकून करण म्हणतो की, मला आशा आहे की या सर्व अभिनेत्यांच्या पत्नींनाही हे पाहायला मिळेल. तेव्हा सारा उत्तरात म्हणते, 'आशा आहे की त्यांच्यासोबत त्यांचा पतीसुद्धा पाहात असेल.' (हे वाचा:कतरिनाला सोडून विकी कौशल इंदूरला रवाना, पण काही तासाताच पत्नीची... ) साराचं हे उत्तर ऐकून धनुषही आश्चर्यचकित होतो आणि हसायला लागतो. तुम्हाला सांगू इच्छितो, याआधीही सारा अली खान करण जोहरच्या चॅट शोचा भाग बनली आहे. ती तिचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत या शोमध्ये सहभागी झाली होती. त्याचवेळी, धनुषसाठी ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा तो करण जोहरच्या शोचा भाग बनला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Karan Johar, Sara ali khan

  पुढील बातम्या