S M L

VIDEO : जेव्हा अर्जुन कपूरला सेक्स लाईफबद्दल विचारतो करण जोहर

या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा एपिसोड चांगलाच रंगलाय. आपल्या बहिणीसमोर सेक्स लाईफबद्दल बोलायला अर्जुन चांगलाच लाजला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2018 10:28 AM IST

VIDEO : जेव्हा अर्जुन कपूरला सेक्स लाईफबद्दल विचारतो करण जोहर

मुंबई, 19 नोव्हेंबर : करण जोहरच्या काॅफी विथ करणचा हा नवा सिझन खूप लोकप्रिय होतोय. या शोमध्ये कलाकार येऊन खूप धमाल करतायत.अक्षय कुमार, रणवीर सिंग, वरुण धवन, कतरिना कैफसारखे स्टार्स या शोमध्ये आले होते. आता पहायला मिळणार आहे भावा-बहिणीचा करिष्मा.


या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा एपिसोड चांगलाच रंगलाय. यात दोघांमधले बंध चांगलेच जाणवतायत. अर्जुनला करणनं विचारलं, हल्ली प्रत्येक जण आपल्या सेक्स लाईफबद्दल बोलायला घाबरत नाही. तू काय सांगशील ?



आपल्या बहिणीसमोर सेक्स लाईफबद्दल बोलायला अर्जुन चांगलाच लाजला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. इतर प्रश्नांची मात्र दोघांनी दिलखुलास उत्तरं दिली.


Loading...



 





View this post on Instagram




 

Koffee with the Siblings 💖💯 @arjunkapoor @janhvikapoor . . . #arjunkapoor #janhvikapoor #koffeewithkaran #siblings #siblingslove #siblinggoals #thekapoors #kapoorfamily #bollywood #koffeewitharjun #koffeewithjanhvi #arjunandjanhvi


A post shared by Arjun Kapoor & Anshula Kapoor (@arjunandanshula) on






काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ या शोमध्ये आली होती. त्यात तिला प्रश्न विचारला की, तू प्रेमाकडे कसं पाहतेस? 'प्रेमात तुम्ही नेहमी पाहता की तुमचा जोडीदार तुमच्याकडे किती लक्ष देतोय, किती प्रेम करतोय. ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या संबंधांवर, रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकतो.' कतरिना म्हणते.


पुढे ती म्हणाली, ' स्त्रीच्या आयुष्यात पुरुष हवाच. पण तुम्ही तुमचा आनंद तुमच्या जोडीदारामध्ये शोधता. याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो.' कतरिना आणि रणबीर कपूरचं नातं तुटलं. काही महिने दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या बोलण्यात तिचं दु:ख चांगलंच जाणवलंय.


टीव्हीच्या या सर्वात हॉट अभिनेत्रीचे योगा करतानाचे फोटो व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 10:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close