मुंबई 25 एप्रिल: कोयना मित्रा (Koena Mitra) ही एकेकाळी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. आपल्या मादक अदांच्या जोरावर तिनं 2000च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळवली होती. तिचं ओ साकी साकी रे हे गाणं तर आजही प्रेक्षक तितक्याच आवडीनं पाहतात. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिनं एक चूक केली. अन् या चूकीमुळं तिच्या करिअरला उतरती कळा लागली. आज कोयना बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. मात्र तिनं केलेल्या त्या चूकीसाठी ती आजही चर्चेत असते. (koena mitra wrong plastic surgery)
कोयनाननं अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र ही शस्त्रक्रिया केल्यावर सुंदर दिसण्याऐवजी ती विचित्र दिसू लागली. त्यानंतर तिनं आपला चेहरा पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकदा सर्जरी केली. मात्र यामुळं ती अधिक विद्रूप दिसू लागली. अलिकडेच तिनं झूमला टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं पहिल्यांदाच आपल्या चूकीच्या सर्जरीचा अनुभव सांगितला.
अवश्य पाहा - Video: अभिनेत्रीनं मोडले लॉकडाउनचे नियम; माजी आमदारासोबत करत होती डान्स
ती म्हणाली, “शस्त्रक्रियेनंतर प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ लागतं. काही जण अधिक तंदुरुस्त होतात तर काही अधिक आजारी पडतात. मी कदाचित दुसऱ्या श्रेणीत येते. मी माझ्या चीकबोन्सची सर्जरी केली होती. खरं तर ही खूप सामान्य शस्त्रक्रिया आहे. जगभरातील अनेकजण करतात. परंतु यामुळं माझ्या गालांमध्ये पाणी जमा होऊ लागलं. कारण सर्जरी केल्यानंतर मला जी औषधं देण्यात आली होती त्यांचा वाईट परिणाम माझ्या शरीरावर झाला होता. शस्त्रक्रियेनंतर माझा चेहरा लोकांना विचित्र दिसत होता कारण तो औषधांच्या साईडइफेक्टमुळं सुजला होता. परंतु लोकांनी आणि माध्यमांनी चूकीच्या प्रकारे त्यावर प्रतिक्रिया दिल्या. माझं नाक तुटलं, माझ्या गालांवर खड्डा पडला, मी चेटकीणीसारखी दिसतेय अशा अनेक अफवा पसरवल्या. त्यामुळं माझ्या करिअरला उतरती कळा लागली.”
अवश्य पाहा - ‘तुझे फोटो पाहून तरुणांना वेड लागेल’; नुसरतला पाहून अभिनेता झाला थक्क
कोयनानं या मुलाखतीत सर्जरी करण्याचा निर्णय चुकला नाही असं जरी म्हटलं तरी तिनं चीकबोन्स सर्जरी केल्यानंतर नाक आणि कपाळावर देखील शस्त्रक्रिया केली होती. या सर्जरी तिनं का केल्या याचं उत्तर तिनं दिलं नाही. मात्र या सर्जरीनंतर तिची लोकप्रियता हळूहळू कमी होत गेली. निर्मात्यांनी तिला काम देणं थांबवलं. परिणामी बेरोजगार अवस्थेतच तिनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला अन् ती लग्न करुन अमेरिकेत स्थायिक झाली. अलिकडेच बिग बॉसच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा भारतात आली. पण इथं येताच पुन्हा एकदा तिच्या प्लास्टिक सर्जरीची चर्चा रंगली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi entertainment