मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आमिरच्या PK मध्ये सुशांतनं या कारणासाठी साकारली होती छोटीशी भूमिका

आमिरच्या PK मध्ये सुशांतनं या कारणासाठी साकारली होती छोटीशी भूमिका

सुशांतनं 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पीकेमध्ये छोटीशी भूमिका साकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

सुशांतनं 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पीकेमध्ये छोटीशी भूमिका साकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

सुशांतनं 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पीकेमध्ये छोटीशी भूमिका साकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

मुंबई, 24 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन आता जवळपास एक आठवडा उलटला आहे मात्र त्याच्या आठवणी संपत नाही आहे. प्रत्येक दिवशी त्याचे चाहते काही ना काही नवीन व्हिडीओ आणि फोटो किंवा जुन्या मुलाखती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. 2013 मध्ये 'काय पो छे' या सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांतनं अवघ्या 7 वर्षांच्या कारकिर्दीत काही खूपच चांगले सिनेमे दिले. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला पीके हा असाच एक सिनेमा. या सिनेमा सुशांत छोटीशी भूमिका साकारली होती मात्र ती प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहिली. सुशांतनं 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पीकेमध्ये छोटीशी भूमिका साकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. या मुलाखतीत सुशांत म्हणाला, पीकेमध्ये माझी भूमिका खूपच छोटीशी होती. मात्र ती भूमिका तेवढीच महत्त्वाची सुद्धा होती. या सिनेमाआधी सुशांत 'काय पो छे' आणि 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमात लीड रोलमध्ये दिसला होता.
चांगली स्क्रीप्ट असेल तर छोटाशी भूमिका सुद्धा महत्त्वाची... सुशांतनं या मुलाखतीत सांगितलं होतं, 'पीके'मधील भूमिका नेहमीच आठवणीत राहील. राजकुमार हिरानींसोबत काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. मला माहीत होतं की, ही भूमिका खूप लहान आहे. पण माझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची होती की प्रेक्षकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे. एखादी स्क्रीप्ट चांगली असेल तर मला छोटीशी भूमिका साकारण्यासाठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. सुपरहिट सिनेमा पीकेमध्ये आमिर खान आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत होते. तर सुशांतनं अनुष्काचा पाकिस्तानी बॉयफ्रेंड सर्फराज यूसुफची भूमिका साकारली होती. यानंतर त्यानं 2016 मध्ये एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी केला. त्याचा हा सिनेमा सर्वात हिट झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या त्याच्या 'छिछोरे' सिनेमानं सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.
First published:

Tags: Aamir khan, Anushka sharma, Bollywood, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या