बई, 15 फेब्रुवारी : पूजा सावंत (Pooja Sawant) आणि गश्मिर महाजनी (Gashmir Mahajani) हे मराठी मनोरंजन विश्वातील (Marathi entertainment) दोन लोकप्रिय सेलिब्रिटी. गेले काही दिवस या दोघांमधल्या अफेअरच्या (affair) चर्चा सुरू होत्या.
पूजा सावंतनं गश्मिरला थेट लव्ह यू (Love you) म्हटलं होतं. त्यानंतर अनेक तर्कवितर्कही लढवले जात होते. सोशल मीडियावर दोघांचं चॅटिंगही व्हायरल (chatting went viral on social media) झालं होतं. या चॅटिंगमागचं कारण आता समोर आलं आहे. हा एक 'लव्ह यू मित्रा' नावाचा सिनेमा (Love you Mitra Marathi cinema) आहे. यात पूजा सावंत आणि गश्मिर महाजनी हे प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमातील अजून एका कलाकाराचं नाव मात्र अद्यापही जाहीर झालं नाही. या तिसऱ्या कलाकाराचं नाव जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला (Director) सांगतात, 'असा विषय मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच हाताळला गेला आहे. हा सिनेमा अगदी घरच्यांसह बसून तुम्ही पाहू शकता. निर्माते वरूण बागला सांगतात, 'मी निर्मिती क्षेत्रात पहिल्यांदाच उतरलो असलो तरी माझी सगळी टीम अतिशय अनुभवी आहे.
सिनेमात पूजा सावंत, गश्मिर महाजनीसह इतरही कसलेले कलाकार आहेत. लव्ह यू मित्रा हा प्रेमाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा सिनेमा आहे. एकविसाव्या शतकातील पुरोगामी आणि प्रयोगशील पिढीला हा सिनेमा नक्कीच आपला वाटेल असंही सिनेमाच्या टीमनं सांगितलं आहे.
हेही वाचा मराठमोळी अभिनेत्री स्वप्नाली जेव्हा आस्तादसाठी उखाणा घेते, पहा व्हायरल video
गश्मिर सांगतो, 'स्क्रिप्ट वाचताच माझ्या मनाला ती खूप भावली. त्यात खरोखर एक वेगळेपण आहे. चित्रपटाचा आशय अतिशय प्रगल्भ आहे. सगळ्या टीमला माझ्या खूप सदिच्छा!' चित्रपटाचं नाव आणि पोस्टरमुळं साहजिकच रसिकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट पूजा आणि गश्मिरच्या चाहत्यांसह काहीतरी वेगळं पाहू इच्छिणाऱ्यांसाठी एक छान भेट ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.