या 5 कारणांमुळे हिट होईल ‘टोटल धमाल’

या 5 कारणांमुळे हिट होईल ‘टोटल धमाल’

असं म्हटलं जातं की, आतापर्यंतच्या दोन सिनेमांनी जेवढा नफा मिळवला त्याहून जास्त नफा हा तिसरा सिनेमा मिळवेल.

  • Share this:

अजय देवगण- गोलमाल सीरिजमध्ये अजय देवगणची विनोदी भूमिका साऱ्यांनाच आवडली होती. आता टोटल धमाल सिनेमातही त्याचं नाव जोडलं गेलं आहे. अजय हा बॉलिवूडचा असा हरहुन्नरी अभिनेता आहे जो गंभीर भूमिकेपासून विनोदी भूमिकेपर्यंत साऱ्याच व्यक्तिरेखा तो एकहाती वठवतो. ट्रेलरमधील अजयची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना याआधीच आवडली, त्यामुळे या सिनेमातला त्याचा रोल पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.

नवीन स्टारकास्ट- नवीन कलाकार हेच टोटल धमाल सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे. २००७ मध्ये आलेल्या धमाल सिनेमात चार मित्रांची कथा सांगण्यात आली होती. यात आशीष चौधरी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि अर्शद वारसी यांची मुख्य भूमिका होती. तर २०११ मध्ये आलेल्या डबल धमाल सिनेमातही हे चारही अभिनेते होते. मात्र आता तिसऱ्या भागात निर्मात्यांनी इतर कलाकारांचा समावेश केला. आता या सिनेमात आशीष चौधरीला वगळून अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, ईशा गुप्ता, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, बोमन इरानी, संजय मिश्रा, अली असगर, महेश मांजरेकर, जॉनी लीवर हे विनोदाचे तगडे कलाकार दिसणार आहेत.

माधुरी दीक्षित- अनिल कपूरची जोडी- या सिनेमाच्या निमित्ताने जवळपास दोन दशकांनी माधूरी आणि अनिलची हिट जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ९० च्या दशकात या जोडीने धमाल उडवून दिली होती. या सिनेमात दोघंही विनोद करताना दिसणार आहेत. याआधी अनिलला विनोदीपटात काम करताना पाहिलं आहे पण माधुरीला विनोदीपटात काम करताना पाहणं तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक ट्रीट असेल.

अॅडव्हेंचर्स कॉमेडी- टोटल धमालमध्ये यावेळी प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या विनोदासोबत अॅडव्हेंचर्सही मिळणार आहे. या आधीच्या धमाल सीरिजमध्ये पैशांच्या मागे धावतानाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यावेळी ५० कोटी रुपयांसाठी सगळे पळताना दिसणार आहेत. पैसे मिळवण्यासाठी पळणाऱ्या या कलाकारांचा प्रवास अॅडव्हेंचर्स असणार आहे.

या वर्षातला पहिला विनोदीपट- टोटल धमाल हा या वर्षीचा पहिला विनोदीपट आहे. जानेवारी महिन्यात राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आणि देशभक्तीशी निगडीत सिनेमे प्रदर्शित झाले. तर फेब्रुवारीमध्ये रोमँटिक आणि ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले. दरम्यानच्या काळात एकही विनोदीपट प्रदर्शित झाला नाही, याचा फायदा नक्कीच सिनेमाला होईल. असं म्हटलं जातं की, आतापर्यंतच्या दोन सिनेमांनी जेवढा नफा मिळवला त्याहून जास्त नफा हा तिसरा सिनेमा मिळवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 08:47 AM IST

ताज्या बातम्या