...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

आलिया भट्टची सर्वात जवळच्या मैत्रिणीला सध्या तो डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 09:37 AM IST

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

मुंबई, 20 ऑगस्ट- सध्या टीम इंडियाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर केएल राहुल (KL Rahul) बराच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या तो आलिया भट्टची (Alia Bhatt) जवळची मैत्रीण आकांक्षा रंजनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहुलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता त्याने आपलं मौन सोडलं असून या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. केएल राहुलने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'मी वृत्तपत्र वाचत नाही. त्यामुळे माझ्याबद्दल काय छापून येतं याबद्दल मला फारसं माहीत नसतं. आपलं खासगी आयुष्य कसं खासगी ठेवायचं हे आता मी शिकलो आहे. सध्या माझं संपूर्ण लक्ष क्रिकेटवर आहे.'

कोण आहे आकांक्षा रंजन?

आकांक्षा रंजनसोबत केएल राहुलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वतः आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केएल राहुलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. आकांक्षा एक मॉडेल आणि अभिनेत्री असली तरी तिला सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि आलियाची जवळची मैत्रीण म्हणून जास्त ओळखलं जातं. तिचे वडील शशी रंजन स्वतः अभिनेते आणि दिग्दर्शक होते. ते FTII चे अध्यक्षही होते. आकांक्षाची बहीण अनुष्काही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आहे.

वेस्टइंडीजमध्ये आहे केएल राहुल

सध्या केएल राहुल वेस्टइंडिजमध्ये आहे. 22 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत तो सलामीवीर म्हणून खेळणार आहे. वेस्टइंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिकेत त्याला संधी देण्यात आली नव्हती. शिखर धवनच्या पुरागमनामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र आता त्याच्याकडे कसोटी सामन्यांत स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. असं असलं तरी सराव सामन्यात केएल राहुलची कामगिरी समाधानकारक नव्हती. वेस्टइंडिज ए विरुद्ध राहुलने फक्त 36 धावाच केल्या.

Loading...

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...