Home /News /entertainment /

KL Rahul Birthday : आथियाने दिली राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली, वाढदिवशी शेयर केले Romantic Photo

KL Rahul Birthday : आथियाने दिली राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली, वाढदिवशी शेयर केले Romantic Photo

आज क्रिकेटर के. एल. राहुल याचा ( KL Rahul Birthday ) वाढदिवस आहे. या खास दिवसाचं निमित्त साधत अथिया शेट्टीनं के एल राहुलसोबतचं काही रोमॅंटीक फोटो शेअर केले आहेत.

  मुंबई, 18 एप्रिल- KL Rahul Birthday: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul) यांचं नातं कुणापासून लपलेलं नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. आज क्रिकेटर के. एल. राहुल याचा ( KL Rahul Birthday ) वाढदिवस आहे. या खास दिवसाचं निमित्त साधत अथिया शेट्टीनं के एल राहुलसोबतचं काही रोमॅंटीक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट करत आज के. एल. राहुलनं कमेंट करत प्रेमाची जाहिर कबुलीच दिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनं क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul) यांच्यासोबतचे काही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. अथिया शेट्टीनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तुझ्यासोबत कुठं ही...वाढदिवसाच्या शुभेच्छा! अथियाच्या या खास पोसवर लव्ह यू म्हणत के.एलने प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. सध्या या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा-तू आधीच हिरोईन फक्त तुला दिग्दर्शक..' मानसी नाईकच्या व्हिडिओवर चाहत्याची कमेंट यापूर्वी अथियाच्या वाढदिवसाला म्हणजेच, गेल्या 5 नोव्हेंबरला के.एल.राहुलने तिला विश करत, तिच्यासोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला होता. हॅपी बर्थ डे माय हार्ट, असं लिहित त्यानं अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
  अथिया शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अथियाने 2015 मध्ये 'हीरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर 2017 मध्ये तिचा 'मुबारकां' सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'मोतीचूर चकनाचूर' हा सिनेमा आला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kl rahul, Sport

  पुढील बातम्या