मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KKR नं 'या' सिनेमाला दिला पॉर्नचा दर्जा; म्हणाला, ''हा तर पॉर्न मूव्ही...'', Twitter वर शेअर केला Review

KKR नं 'या' सिनेमाला दिला पॉर्नचा दर्जा; म्हणाला, ''हा तर पॉर्न मूव्ही...'', Twitter वर शेअर केला Review

कमाल आर. खान म्हणजेच केआरके (KRK). अभिनेता केआरकेनं आयुष्मान आणि वाणी कपूरच्या (Vaani Kapoor) 'चंडीगढ़ करे आशिकी' (Chandigarh Kare Aashiqui) या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.

कमाल आर. खान म्हणजेच केआरके (KRK). अभिनेता केआरकेनं आयुष्मान आणि वाणी कपूरच्या (Vaani Kapoor) 'चंडीगढ़ करे आशिकी' (Chandigarh Kare Aashiqui) या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.

कमाल आर. खान म्हणजेच केआरके (KRK). अभिनेता केआरकेनं आयुष्मान आणि वाणी कपूरच्या (Vaani Kapoor) 'चंडीगढ़ करे आशिकी' (Chandigarh Kare Aashiqui) या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: बॉलिवूडमधील मोजक्या गुणी कलाकारांमध्ये आयुष्मान खुराणाचा (Ayushmann Khurrana) समावेश होतो. अतिशय वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. आतापर्यंत त्यानं अभिनय केलेल्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून दाद दिलेली आहे. आज (10 डिसेंबर 2021) त्याचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुकदेखील केलं आहे; मात्र एक व्यक्ती अशी आहे, जिला आयुष्मानचा हा नवीन चित्रपट अजिबात आवडला नाही. ही व्यक्ती आहे कमाल आर. खान म्हणजेच केआरके (KRK). अभिनेता केआरकेनं आयुष्मान आणि वाणी कपूरच्या (Vaani Kapoor) 'चंडीगढ़ करे आशिकी' (Chandigarh Kare Aashiqui) या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. इतकंच नाही, तर हा चित्रपट म्हणजे, सॉफ्ट पॉर्न (Soft Porn) आहे, असा शिक्कादेखील केआरकेनं मारला आहे. बॉलिवूड लाइफ डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला 'चंडीगढ़ करे आशिकी' हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. आयुष्मानच्या या चित्रपटात सेक्सच्या समस्येवर (Sex Issue) फोकस ठेवण्यात आला आहे. कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेल्या केआरकेनं प्रेस शो/प्रीमियर पाहिल्यानंतर चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच रिव्ह्यू देऊन टाकला आहे. त्यानं आपल्या ट्विटर अकाउंटवर या चित्रपटाचा रिव्ह्यू पोस्ट केला. त्यानं एकापाठोपाठ एक ट्विट करून आयुष्मानच्या चित्रपटावर टीका केली आहे.

केआरकेनं चित्रपटाच्या इंटरव्हलमध्येच रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली होती. ''चंडीगढ़ करे आशिकी' या चित्रपटाला मी अगोदर सॉफ्ट पॉर्न समजत होतो; मात्र हा चित्रपट फक्त सॉफ्ट पॉर्न नाही तर पंजाबी सॉफ्ट पॉर्न आहे. त्यामुळे चित्रपटाचं नाव 'चंडीगढ़ करे आशिकी' नाही, तर 'सेक्स इन चंडीगढ़' असं ठेवायला पाहिजं होतं. कारण, या सॉफ्ट पॉर्न फिल्मच्या प्रत्येक डायलॉगमध्ये 'सेक्स' हा शब्द वापरला गेला आहे,' असं ट्विट केआरकेनं केलं आहे.

हेही वाचा-  Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: या सुंदर PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची ब्लू-डायमंड एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

''सेक्स इन चंडीगढ़' या चित्रपटात अश्लीलता (obscenity) आणि गे सेक्सचा भडिमार करण्यात आलेला आहे आणि ही गोष्ट लज्जास्पद आहे. बॉलिवुडमध्ये अनेक गे व्यक्ती काम करतात हे मला मान्य आहे; पण याचा अर्थ असा नाही की गे सेक्स स्टोरीवर चित्रपट बनवला पाहिजे. असा सुमार दर्जाचा चित्रपट पाहण्यात कुणालाही रस नसेल, हे मी ठामपणे सांगू शकतो,' असं देखील केआरके म्हणाला आहे.

केआरकेच्या या टीकेवर चित्रपटाशी संबंधित कुठल्याही व्यक्तीनं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. केआरकेनं यापूर्वीदेखील अनेक चित्रपटांचे उत्स्फूर्तपणे रिव्ह्यू देऊन वाद ओढून घेतलेले आहेत. त्यामुळे 'चंडीगढ़ करे आशिकी' या चित्रपटाच्या रिव्ह्यूमुळे वाद निर्माण झाल्यास त्याच्यासाठी ही नवीन गोष्ट नसेल.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor