मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /KK च्या पोस्टमॉर्टेमधून मृत्यूबाबत मोठा खुलासा! पोटात सापडली 10 तऱ्हेची औषधं

KK च्या पोस्टमॉर्टेमधून मृत्यूबाबत मोठा खुलासा! पोटात सापडली 10 तऱ्हेची औषधं

KK च्या पोस्टमॉर्टेमधून मृत्यूबाबत मोठा खुलासा! पोटात सापडली 10 तऱ्हेची औषधं

KK च्या पोस्टमॉर्टेमधून मृत्यूबाबत मोठा खुलासा! पोटात सापडली 10 तऱ्हेची औषधं

प्रसिद्ध गायक केके (KK Death) याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची नोंद करण्यात आली. परंतू त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अॅसिडिटी, गॅसचा त्रास यावरची आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अॅलोपॅथीची अनेक औषधं घेत असल्याचं पुढे आलं आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 03 जून: लोकप्रिय गायक केके (Singer KK No more) यांच्या हृदयाभोवती मेदयुक्त पदार्थांचा थर (Fatty Layer) आढळल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये (Autopsy Report) नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर त्या रिपोर्टसह त्यांचा व्हिसेरा रिपोर्ट हिस्टोपॅथॉलॉजिकल टेस्टसाठी (Histopathological Test) पाठवण्यात आला आहे. हिस्टोपॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये टिश्यूजचा अभ्यास केला जातो आणि ब्लॉकेजेस (Heart Blockages) असल्यास त्याची माहिती मिळते. गुरुवारी (2 जून) पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. ETimes ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं, की मेदयुक्त पदार्थांच्या थराचा रंग पांढऱ्या रंगात परिवर्तित झाला होता. तसंच हृदयाचे व्हॉल्व्ह एकदम कडक असल्याचं हृदय उघडल्यानंतर आढळलं.

    पोलीस सूत्रांनी ई-टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, 'हृदयात कडकपणा निर्माण होण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि व्हिसेरा रिपोर्ट हिस्टोपॅथॉलॉजिकल टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातून ब्लॉकेजेसचा छडा लागू शकेल.'

    दरम्यान, पोलिस सूत्रांनी अशीही माहिती दिली, गॅस्ट्रिक आणि लिव्हरशी संबंधित, तसंच व्हिटॅमिन सीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या 10 औषधांचे अंश केके यांच्या शरीरात आढळले. तसंच, अँटासिड (Antacid) आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देणारी औषधं आणि आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधांच्या अंशाचाही त्यात समावेश असल्याची माहिती तपासणीत आढळल्याचं पोस्ट मॉर्टेममध्ये आढळलं.

    पोलिसांनी अशीही माहिती दिली, की केके वारंवार अँटासिड पिल्स खायचे असं लक्षात आलं आहे. 31 मेच्या सकाळी त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं होतं, की त्यांना शक्ती, उत्साह कमी असल्यासारखं वाटत आहे. त्याच रात्री, त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी केके यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं होतं, की त्यांचे खांदे आणि हात दुखत आहेत.

    दरम्यान, एका ताज्या रिपोर्टवरून अशी शक्यता वर्तवली जात आहे, की केके यांच्या हृदयात अनेक ब्लॉकेजेस असले, तरीही त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास (CPR) वेळेवर दिला गेला असता, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. ज्या डॉक्टरनी पोस्ट-मॉर्टेम केलं, त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी असंही सांगितलं, की ' त्यांच्या डाव्या बाजूच्या मुख्य कोरोनरी आर्टरीमध्ये मोठा ब्लॉक होता. तसंच, अन्य अनेक धमन्या आणि छोट्या रक्तवाहिन्यांमध्येही छोटे ब्लॉकेजेस होते. लाइव्ह शोमध्ये झालेल्या अतिरिक्त एक्साइटमेंटमुळे रक्तप्रवाह थांबला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे प्राण गेले.'

    कृष्णकुमार कुन्नथ हे त्यांचं पूर्ण नाव; पण ते केके याच नावाने लोकप्रिय होते. 31 मे रोजी कोलकात्यात एका Nazrul Mancha इथल्या लाइव्ह कॉन्सर्टनंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    First published:

    Tags: Bollywood News, Kolkata, Mumbai, Salman khan, Singer