केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव झळकणार मराठी चित्रपटात

केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव झळकणार मराठी चित्रपटात

'एक सांगायचंय.... UNSAID HARMONY' या चित्रपटात बॉलिवूडमधील दमदार अभिनेता के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव ही जोडी पहिल्यांदाच मराठीत एकत्र झळकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 9 आॅक्टोबर : मराठी सिनेमाकडे हल्ली बाॅलिवूड कलाकारांचं लक्ष वळलंय. अनेक बाॅलिवूड कलाकारांनी मराठी सिनेमाची निर्मिती केलीय. मग अजय देवगण, प्रियांका चोप्रा, जाॅन इब्राहम, रितेश देशमुख यांनी चांगल्या मराठी सिनेमांची निर्मिती केली. हिंदी कलाकार मराठी सिनेमातही काम करतायत. त्यात आता दोन नाव जोडली गेलीयत.

अभिनेता लोकेश विजय गुप्ते आता दिग्दर्शक म्हणून आपल्या पुढे येतोय. देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती

असलेल्या 'एक सांगायचंय.... UNSAID HARMONY'  या चित्रपटात बॉलिवूडमधील दमदार अभिनेता के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव ही जोडी पहिल्यांदाच मराठीत  एकत्र झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.

आई-वडिलांसोबत मुलांचा हरवत असलेला संवाद सिनेमाचा मुख्य विषय आहे.  के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं टायटल लाँच केलं होतं. त्यावेळी के. के मेनन म्हणाला, ' मी मराठी सिनेमे पाहतो. ते आशयघन आहेत. मला मराठी कळतं. बोलता येत नाही. पण या सिनेमासाठी मी मराठीचे धडे गिरवतोय.'

नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. पुष्पांक गावडे  सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांनी  वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे तर ऑस्कर विजेत्या रेसुल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.

येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ना 'बाबुजी', ना 'संस्कारी'... लैंगिक शोषणाचे आरोपी आहेत 'हे' सेलिब्रिटीज

First published: October 9, 2018, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading