मुंबई 15 जून: झी मराठीवरील (
Zee Marathi) एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘किचन कल्लाकार’ कडे (
Kitchen Kallakar) पाहिलं जातं. या कार्यक्रमात अनेक मोठमोठ्या कलाकारांना आपले कुकिंग स्किल दाखवताना आणि बरेचदा
फसताना , चुकताना सुद्धा अनेकांनी पाहिलं आहे. असं जरी असलं तरी हा कार्यक्रम बघायला प्रेक्षकांना कायमच मजा येते हे मात्र खरं. या कार्यक्रमात तीन धमाकेदार मंडळी लवकरच येणार आहेत आणि त्यासंबंधी बरीच चर्चा होताना सुद्धा दिसत आहे.
'बिग बॉस मराठी' कार्यक्रमातून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेले कवी मनाचे नेते (
Abhijit Bichukale) अभिजित बिचुकले, (
Trupti Desai)तृप्ती देसाई आणि (
Jaywant Wadkar) जयवंत वाडकर असे तीन मान्यवर या कार्यक्रमाच्या नव्या भागात पाहायला मिळणार आहेत. बिचुकले यांचा अंदाज कायमच प्रेक्षकांना आवडत आला आहे आणि आता ते या मंचावर येऊन काय कल्ला करतात हे पाहण्यासारखं असेल.
यासंबंधीचा एक विडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावर पोस्ट झाला असून त्यांच्या येण्याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या व्हिडिओमध्ये बिचुकले त्यांच्या भन्नाट अंदाजात एक कविता सादर करताना दिसत आहेत. 'गोरे गोरे मुखड पे काला काला चष्मा' या गाण्याच्या चालीवर त्यांनी एक भन्नाट कविता सादर केली असून त्यावर तृप्ती देसाई त्यांना खुसखुशीत टोमणा मारताना सुद्धा दिसत आहेत.”जे काही तिर मारायचे ते आता पदार्थ करताना मारा,” अशा शब्दात तृप्ती यांनी बिचुकले यांना टोला लागलाव असून त्यांच्या या अंदाजावर सगळे दिलखुलास हसताना दिसले आहेत. आता बिचुकले आल्यावर कार्यक्रमात मनोरंजन तर शंभर टक्के होणार हे नक्की.
भल्याभल्या कलाकारांची शिट्टी वाजवणारा आणि त्यांना संकटात पाडणारा झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’ आता सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे. किचन कल्लाकार या कार्यक्रमात आजवर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.
हे ही वाचा- किचन कल्लाकारमधील कलाकारांचा कल्ला आता होणार बंद, शो लवकरच घेणार निरोप?
ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, संजय मोने, संजय नार्वेकर अशा मातब्बर मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसंच काही राजकीय मंडळींना सुद्धा या कार्यक्रमात येण्याचा मोह आवरता आला नव्हता. पंकजा मुंडे, चित्र वाघ, किशोरी पेडणेकर, रुपाली ठोंबरे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.