मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video : श्रेयाने बनवला मोदक अन् झालं भलतच तर वंदना गुप्तेंच्या पुरण पोळीनं उडवला गोंधळ

Video : श्रेयाने बनवला मोदक अन् झालं भलतच तर वंदना गुप्तेंच्या पुरण पोळीनं उडवला गोंधळ

काय म्हणता..या सेलेब्सचा  देखील फसलाय स्वयंपाकाचा बेत, ऐका त्यांच्या तोंडून याची गंमत..

काय म्हणता..या सेलेब्सचा देखील फसलाय स्वयंपाकाचा बेत, ऐका त्यांच्या तोंडून याची गंमत..

काय म्हणता..या सेलेब्सचा देखील फसलाय स्वयंपाकाचा बेत, ऐका त्यांच्या तोंडून याची गंमत..

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 13 डिसेंबर: झी मराठीवर (Zee Marathi )लवकरच एक किचनशी संबंधीत असा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचं नाव 'किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) असं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade ) करताना दिसणार आहे.  यामध्ये कलाकार विविध पदार्थ बनवताना दिसणार आहेत. त्यामुळे किचनवर नक्की कल्ला तर होणारच मात्र यामुळे त्याचं स्वयंपाक स्कील देखील सर्वांना पाहता येणार आहे. त्यामुळे कुणाच बेत फसणार व कुणाचा बेत उत्तम होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र स्वयंपाक करताना असेच काही बेत फसत असतात. आता हीच गंमत मराठीतील काही कलाकार शेअर करत आहेत.

झी मराठीनं नुकताच किचन कल्लाकारचा एक प्रोमो आऊट केला आहे. यामध्ये हे कलाकार त्यांचा स्वयंपाकाचा बेत कसा फसला ते सांगताना दिसत आहे. कुणाची पुरणपोळी झाली भाकरी तर कुणाचा मोदक झाला चपटा..असे अनेक गंमतीदार किस्से झी मराठीसोबत कलाकारांनी शेअर केले आहेत.

वाचा : पार्टीमुळे नाही, त्या व्यक्तीमुळे कोरोना झाला - करीनाने दिली पहिली प्रतिक्रिया

अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं देखील लग्नानंतर जेव्हा सासुबाईंनी मोदक करायला सांगितल्याचा एक गोड किस्सा सांगितला आहे. 21 मोदकापैकी तिचा एक मोदक कसा वेगळा आणि चपटा झालेला याची गंमत तिनं सांगितली आहे.  तिचा मोदक मोमोज कसा झाला हेच तिला यातून सांगायचे आहे.  तर चला हवा येऊ द्या फेम तुषार देवल यांनी देखील पोळीचं पीठ मळता येते मात्र आजपर्यंत काही पोळी लाटता आली नाही यामागची गंमत सांगितली आहे.

अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी देखील सासू -सासरे यांच्यासाठी नवीन घऱात केलेल्या पुरण पोळीचा बेत कसा फसला याचा किस्सा सांगितला आहे. पुरण पोळीच्या परणाच्या भाकरी कशा झाल्या याचं कारण सांगितलं आहे. मात्र पुरण पोळीनं कसा त्यांचा गोंधळ उडवला याचीच ही गंमत त्यांनी सांगितली आहे. तसेच संदीप पाठकने देखील पोहे करण्याचा पहिला बेत आणि तो पिवळा न झाल्यामुळे काय केले याचा किस्सा सांगितला आहे. आणि हो आता पोहे करताना काय काळजी घेतो याची देखील माहिती दिली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial