Home /News /entertainment /

Kitchen Kallakar: वाह! रामदास आठवले बायकोला करतात ‘या’ कामात मदत

Kitchen Kallakar: वाह! रामदास आठवले बायकोला करतात ‘या’ कामात मदत

किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडमध्ये हे राजकीय नेते धमाल उडवताना दिसणार आहेत.

  मुंबई 22 जून: झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) कार्यक्रमाची क्रेज काही औरच आहे. झी मराठीवरील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘किचन कल्लाकार’ कडे पाहिलं जातं. या कार्यक्रमात अनेक मोठमोठ्या कलाकारांना आपले कुकिंग स्किल दाखवताना अनेकांनी पाहिलं आहे. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात मोठं नाव असणारे तरीही कलेची आवड जोपासणारे नेते अर्थात रामदास आठवले (Dr. Ramdas Athawale) आजच्या भागात पाहायला मिळणार आहेत आणि त्यासंबंधी बरीच चर्चा होताना सुद्धा दिसत आहे. राजकरणात आपल्या काव्यात्मक शैलीने प्रसिद्ध झालेले रामदासजी सपत्नीक या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्याचसोबत रामदास पाध्ये (Ramdas Padhye) आणि त्यांच्या पत्नी सुद्धा या कार्यक्रमाच्या नव्या भागात पाहायला मिळणार आहेत. आठवले जींचा अंदाज कायमच सर्वांना आवडत आला आहे आणि आता ते या मंचावर येऊन काय कल्ला करतात हे पाहण्यासारखं असेल. यासंबंधीचा एक विडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावर पोस्ट झाला असून त्यांच्या येण्याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या व्हिडिओमध्ये रामदासजी आपल्या पत्नीला कामात मदत करतात असं त्या स्वतः स्पष्ट करताना दिसतात. ‘घरात भाजी आणायचं काम माझंच असतं. मी आणतो भाजी कारण मला लागते ताजी.” अशा कमाल विनोदी अंदाजात रामदासजी कविता सादर करताना दिसतात. तसंच कार्यक्रमातील शेठ हे पात्र सुद्धा त्यांची एक अनोखी ओळख करून देत आहे. त्यांना जगातले सर्वात मोठे ज्योतिषी असं म्हणत शेठ त्यांची ओळख करून देताना video मध्ये दिसत आहे.
  दरवेळी पाच वर्षांनी कोणाचं सरकार येणार हे रामदासजींना बरोबर कळत असं शेठ सांगताना दिसतो. रामदास आठवले कायमच आपल्या वक्त्यव्यांसाठी ओळखले जातात. त्यांचावर आंबेडकरांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे आणि ते कायमच राजकरणात सक्रिय असतात. ते या कार्यक्रमात आल्यावर मनोरंजन तर शंभर टक्के होणार हे नक्की. हे ही वाचा- Kshitish Date: 'हे असं छापणं चूक', एकनाथ शिंदेची भूमिका साकारणारा अभिनेता भडकला भल्याभल्या कलाकारांची शिट्टी वाजवणारा आणि त्यांना संकटात पाडणारा झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’ आता सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे. किचन कल्लाकार या कार्यक्रमात आजवर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, संजय मोने, संजय नार्वेकर अशा मातब्बर मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसंच काही राजकीय मंडळींना सुद्धा या कार्यक्रमात येण्याचा मोह आवरता आला नव्हता. पंकजा मुंडे, चित्र वाघ, किशोरी पेडणेकर, रुपाली ठोंबरे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या